Thane Municipal Corporation

ठाणे महानगरपालिका ही मुंबईच्या नजीकची सर्वात मोठी नागरी संस्था आहे. ठाण्यात नगरपालिका (Thane municipal corporation) असल्यापासूनच इथे शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. महापालिकेत रुपांतर झाल्यानंतर सतीश प्रधान हे पहिले महापौर झाले. दिवंगत आनंद दिघे यांचा प्रभाव इथल्या मतदारांवर दिसून येतो. अलिकडील काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शहर म्हणून ठाण्याची ओळख झाली आहे. 2012 पर्यंत या महानगरपालिकेवर शिवसेना आणि भाजपची एकत्र सत्ता होती. पण 2017 मध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. यात 131 पैकी 67 जागा जिंकून शिवसेनेने एकहाती सत्ता स्थापन केली होती. यंदा पुन्हा भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होताना दिसणार आहे.
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com