Konkan Shivsena : विझणारा दिवा फडफड करणारच; भास्कर जाधवांची रामदास कदमांवर बोचरी टीका

Bhashkar Jadhav : सभेतून एकही वेगळा विचार ऐकायला मिळाला नसल्याचा टोला
Bhashkarrao Jadhav, Ramdas Kadam
Bhashkarrao Jadhav, Ramdas KadamSarkarnama

Ramdas Kadam : रत्नागिरीतील खेडमधील गोळीबार मैदानावर ५ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम यांच्यावर तीव्र शब्दात टीक केली होती. त्या सभेला प्रतिउत्तर देण्याासठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रामदास कदम यांनी आज सभा घेतली. या सभेतून मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना जशास तसे उत्तर दिले आहे. यानंतर आमदार भास्कर जाधवांनी रामदास कदम यांच्यासह त्यांचा मुलगा योगेश कदम यांचा चांगलाच समाचार घेतला.

भास्करराव जाधव यांनी रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांची तुलना कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी केली. जाधव म्हणाले की, "परीक्षेला बसल्यानंतर पेपर फुटला आणि तो पेपर जर फुटीर गटाच्या हातामध्ये आला, त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेली कॉफी म्हणजे ते खरे हुशार विद्यार्थी होत नाहीत. परीक्षेत फुटलेला पेपरसुद्धा यांना नीट लिहिता आलेला नाही, इतके हे 'ढ' विद्यार्थी आहेत, अशी टीकाही भास्करराव जाधव यांनी केली आहे. रामदास कदम म्हणजे विझणारा दिवा आहे. विझण्यापूर्वी तो दिवा फडफड करू लागला आहे, अशी बोचरी टीकाही जाधव यांनी कदमांवर केली. रामदास कदम यांचा सातत्याने गद्दारीचा इतिहास राहिलेला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांना तत्व शिकवण्याची गरज नाही. रामदास कदमांनी रोज बोलतात तसेच आजच्या सभेत बोलले आहे. त्यांनी एकही वेगळा विचार या सभेतून दिला नाही."

Bhashkarrao Jadhav, Ramdas Kadam
Eknath Shinde News : सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, सहनशीलतेचा अंत पाहू नका; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना इशारा

दरम्यान, भास्कर जाधव (Bhashkarrao Jadhav) हा सडक्या मेंदुचा आहे. २०२३ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भास्कर जाधव यांना २० फूट खोल गाडणार, अशी टीका रामदास कदम यांनी टीका केली होती. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्यावरही हल्लाबोल केला. कदम म्हणाले, "उद्धव ठाकरे हे एक वर्षभर मला गाडीत घेतल्याशिवाय गाडीत बसत नव्हते. पण नंतर उद्धव ठाकरे मला चार वर्ष भेटले नाहीत. त्याच कारण काय होतं हे तरी त्यांनी सांगावं ना? आता उद्धव ठाकरे हे सुभाष देसाईंना बरोबर घेऊन फिरतात. पण बाळासाहेब ठाकरे हे रामदास कदम सारख्या वाघाला संभाळत होते. आता उद्धव ठाकरे हे सुभाष देसाई यांच्या सारख्या शेळ्या-मेंढ्यांना संभाळतात".

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com