Umarga : उमरगा तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद आणि बिदर जिल्ह्यातील बस्वकल्याण या दोन विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षाच्या लढतीची चर्चा शहरात रंगतेय. दरम्यान सिमेलगत असलेल्या (Karnataka Assembly Election News) कर्नाटकातील जवळपास पंधरा गावातील बरेच मतदार व्यवसाय, मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने उमरग्यात स्थायिक असल्याने अशा मतदारांशी जवळीकता साधण्यासाठी विविध पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांचा संपर्क सुरू आहे.
महाराष्ट्र राज्याच्या अगदी टोकाला असलेला उमरगा तालुका हा कर्नाटक राज्याच्या सिमेवर असल्याने कर्नाटकातील आळंद व बस्वकल्याण शहरातील बाजारपेठेशी संपर्क येतो. (Osmanabad District) एकंबा, उजळंब, गदलेगाव, जामगा, आळंगा, मन्नाळी, व्हन्नाळी, शिरगुर, लाडवंती, घोटाळ, जाजनगुगळी, प्रतापूर, कोपनहिप्परगा, खजुरी, होदलुर, आणूर आदी सिमेलगतच्या कर्नाटकातील या गावातील बरेच नागरिक व्यवसायानिमित्त आणि मुलांच्या मराठी, इंग्रजी भाषेच्या शिक्षणासाठी उमरग्यात रहातात.
आळंद आणि बस्वकल्याण या दोन्ही मतदारसंघातील जवळपास दिड हजार मतदार आहेत, (Maharashtra) त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ज्या, त्या पक्षाचे कार्यकर्ते काम करत आहेत. आळंद विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार बी. आर. पाटील यांनी शहरात मेळावा घेतला. (Marathwada) धाराशिवचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा संगिताताई कडगंचे, उत्तर प्रदेश काँग्रेसचे शिवकुमारसिंग, निसार अहमद अलम, सोलापूर कॉंग्रेसचे धवलसिंह मोहिते - पाटील, आळंदचे विजयकुमार हासुरे, यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
तर गुरूवारी (ता. चार) आशा मंगल कार्यालयात कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष गुत्तेदार यांनी प्रचार सभा घेतली. उमरगा भाजपाचे अँड. अभयसिंह चालुक्य, संताजी चालुक्य, आळंदचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे आदींची उपस्थिती होती. दरम्यान बस्वकल्याण मतदार संघाचे उमेदवार विजयसिंह यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ते बैठका घेत आहेत. विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या येथील प्रमुख नेतेमंडळीच्या माध्यमातुन प्रचार केला जातोय.
याशिवाय कर्नाटकात विविध विकास कामाच्या माध्यमातुन संपर्कात आलेल्या ठेकेदारावरही काही जबाबदारी दिल्याची चर्चा होत आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे बी.आर. पाटील यांचा केवळ ६९७ मतांनी पराभव झाला होता. भाजपाचे सुभाष गुत्तेदार निवडूण आले होते, तेंव्हा नियोजनाप्रमाणे उमरग्यातील मतदारांचा फायदा झाला होता. त्यामुळे या वेळी दोन्ही उमेदवारांनी उमरग्यात मेळावा घेऊन मतदारांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
बसवकल्याण विधानसभा मतदारसंघ क्रमांक -४७ मध्ये काँग्रेस- विजयसिंह, जनता दल सेक्युलर- संजीव कुमार, भाजप- शरणू सलगर, आप - दीपक मालगार. आळंद विधानसभा मतदारसंघ क्रमांक - ४६ : काँग्रेस- बी. आर. पाटील, भाजप- सुभाष गुत्तेदार,आप- शिवकुमार खेड जनता दल सेक्युलर- श्रीमती माहेश्वरी वाले, असे उमेदवार रिंगणात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.