पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे सध्या तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत.
Aditya Thackeray
Aditya Thackeraysarkarnama
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे (Shivsena) नेते व राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सुरक्षा ताफ्यातील दोन ते तीन गाड्यांना अपघात झाला आहे. खारेपाटण चेक पोस्ट जवळ ही घटना घडली. आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून (Sindhudurg) रत्नागिरीला जात असताना हॉटेल मधुबन या ठिकाणी हा अपघात झाला.

आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागे या गाड्या असताना, एका गाडीने अचाणक ब्रेक मारला असता. ताफ्यातील दोन ते तीन वाहने एकमेकांवर धडकून अपघात झाला. या अपघातात कोणी जखमी झाले नाही. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. आदित्य ठाकरे हे सध्या तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत.

Aditya Thackeray
अजित पवारांवर अक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात; 15 जणांवर गुन्हा दाखल..

दरम्यान, कोकणातील रिफायनरी प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये माध्यमांशी संवाध साधताना शिवसेना रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले होते. नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध होत असल्याने हा प्रकल्प लादणार नाही, अशीच शिवसेनेची भूमिका आहे. यामुळे हा रिफायनरी प्रकल्प कोकणातच दुसरीकडे आणला जाण्याची शक्यता आहे. चांगला प्रकल्प येत असेल तर नागरिकांना विश्वासात आम्ही घेऊन पुढे जाऊ व योग्य तो निर्णय घेऊ, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray
'मातोश्री' गिफ्ट प्रकरणावर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले अन् म्हणाले...

प्रकल्पाबाबत स्थानिकांशी चर्चा करुन त्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांना कळवणार आहे. रिफायनरीमुळे पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचणार नाही याचीही काळजी घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा सूर हा रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com