Raigad Political News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधातील टीकेची धार आणखी धारदार करतानाच शिंदे- फडणवीस- पवार सरकारवरही तुफान हल्ला चढवत आहेत. लोकसभेआधीच ठाकरेंनी बंडखोरांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे.त्यात त्यांनी बंडखोर नेत्यांच्या मतदारसंघातच राजकीय वातावरण तापवले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटासह भाजपवर सडकून टीका केली आहे. विशेष म्हणजे ठाकरेंनी महाडचे आमदार भरत गोगावले व लोकसभेचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यावरतीही निशाणा साधला. ते म्हणाले, इथल्या गद्दार खासदारांना प्रश्न पडलाय की, आता उद्धव ठाकरे फिरताहेत गर्दी किती जमेल. पण याला काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा.
या जमलेल्या गर्दीच्या निमित्ताने मला आता शिवसेनेच्या (Shivsena) पहिल्या दसऱ्या मेळाव्याची आठवण आली. 1966 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी पहिली सभा ही शिवतीर्थावरती घेतली. त्यावेळेला शिवाजी पार्क ओसंडून वाहत होतं अशी भावनिक आठवण सांगितली.
ठाकरे काय म्हणाले...?
आम्हांला घराणेशाही आता नको असं सांगणाऱ्या आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुनील तटकरे यांना सांगायचं. आता बस झालं, तुम्ही घरी बसा आम्हाला तुमची घराणेशाही नको काय चाललं आहे. तुमचे वडील खासदार, मुलगी मंत्री, पुतण्या आमदार, आता बस झालं. मला घराणेशाही चालणार नाही. पंतप्रधान उत्तम मराठी बोलतात. त्यांनी हे तटकरेंना सांगावं असं थेट आव्हान देत घराणेशाही या विषयावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार सुनील तटकरे यांनी मला उत्तर द्यावं अशा शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निशाणा साधला आहे.
नितीश कुमार गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे जाणार अशी चर्चा ऐकली होती पण कशासाठी जाणार मी गेले 25-30 वर्षे अनुभवला आहे पाठ फिरवल्यानंतर वार करण्याची संधी भाजपा सोडत नाही हा इतिहास जुना आहे मनोहर जोशी विरोधी पक्ष नेते असताना भुजबळ यांनी शिवसेना सोडली त्यावेळेला शिवसेनेला न विचारता संख्या व त्यांचे वाढलं म्हणून सुधाकर नाईक यांनी गोपीनाथ मुंडेंना विरोधी पक्षनेते पदावर बसवलं. इथपासून हा इतिहास सुरू होतो असं सांगत भाजपबरोबरचा सगळा इतिहासच ठाकरे यांनी सांगितला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अनेक लोक खुर्चीसाठी वेडे असतात. खुर्ची स्वप्नांत दिसते. खुर्चीसाठी वेडे होतात. अनेक वेडे असे असतात की, आज मंत्री होईल. उद्या मंत्री होईल, म्हणून जॅकेट शिवतात. नॅपकिन नवीन घेतात. हे पालकमंत्री नको म्हणून नाराजी व्यक्त करतात. अरे पुन्हा त्याच पालकमंत्र्यांना डोक्यावरती घेऊन घाम पुसत नॅपकिन पळत त्याला फिरावे लागतं असा टोला त्यांनी पुन्हा आमदार भरत गोगावले यांना लगावला आहे.
मला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून उतरवलंत. पण शिवसेना प्रमुखांचा मुलगा जर का पदावरती बसला, तर घराणेशाही. या घराणेशाहीवर मी बोलणारच आहे. पंतप्रधान बोलून गेले की, आम्हाला घराणेशाही नको आहे. याचा आनंद आहे मी त्यांचे स्वागत केलं. पण मी परवा कल्याण मतदारसंघात असताना कल्याणचा खासदार कोण छोटा गद्दार आणि त्याचे वडील कोण मोठा गद्दार असं सांगत तुम्हाला गद्दार यांची घराणेशाही चालते का असा सवाल त्यांनी पंतप्रधान मोदी यांना उपस्थित केला.
मुंबईत 19 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील सागरी महामार्गाच्या पुलाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. पण हा मार्ग पूर्ण झाला आहे का पाहा. हे सगळे टोलभैरव आहेत अशीही टीका त्यांनी सरकारवर केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.