Uddhav Thackeray On Budget 2024 : 'निवडणुका जवळ आल्यानंतर मोदींना...' ; उद्धव ठाकरेंनी बजेटवरुन घेरले!

Uddhav Thackeray Latest Speech : "हा देश अदानींचा नाही.. गरिब, महिला, तरुण, शेतकऱ्यांचा...
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Budget News : आज संसदेत केंद्र सरकारचं अंतरिम बजेट सादर झालं आहे. मोदी सरकारने दुसऱ्या या कार्यकाळातलं शेवटचं बजेटमधून टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. तर या बजेटमधून सरकारचे सकारात्मक बाबी ठळकपणे सांगण्यात आले आहे. तर विरोधकांनी यावर टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोंदींवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

पेण येथील सभेतून उद्धव ठाकरे म्हणाले, "मोदी सरकारचं शेवटचं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलं. मी सीतारमण यांचं अभिनंदन करतो. कारण त्या म्हणाल्या की, या देशात चार जातींसाठी आम्ही काम करणार आहोत. कोणत्या त्या चार जाती? तर गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यासाठी काम करणार असं जाहीर करत त्यांनी मोठं धाडस केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर त्यांनी हे बोलण्याचं धाडस केलं, यासाठी सीतारमण यांचं अभिनंदन. निवडणुका आल्यानंतर का होईना, पण त्यांनी मान्य केलं की, हा देश सूट-बुटातल्या तुमच्या अदानी-अंबानी मित्रांचे नाही, या मित्रांच्या पलीकडे हा देश गरीब, महिला, तरुण आणि शेतकऱ्यांचा आहे. सत्तेच्या दहाव्या वर्षी हे मोदींना कळलं की, तुमच्या बरोबर असणाऱ्या अदानींचा हा देश नाही, सामान्यांचा हा देश आहे,"

निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?

सदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केले. 2024 हे निवडणुकांचे वर्ष असणार आहे. आगामी लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून करदारत्यांसाठी एखादी घोषणा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, अर्थमंत्र्यांनी इनकम टॅक्समध्ये कोणताही बदल होणार नसल्याची घोषणा केली आहे. यामुळे करदात्यांसाठी हा अर्थसंकल्प ना फायदा ना तोटा असाच राहिला आहे.

एक कोटी महिला लखपती -

निर्मला सीतारमण म्हणाल्या, "देशातील एक कोटीहून अधिक महिला लखपती बनल्या आहेत. आता हे उद्दीष्ट एक कोटीवरुन देशातील तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याचं आहे. तर एकूण 9 कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाले आहेत. यामुळे महिला सक्षमीकरणाचे महत्त्वाचे पाऊल आम्ही टाकले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com