Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत 'मागच्या दाराने' युती : उद्धव ठाकरेंचा विरोध लक्षात घेऊन माजी आमदाराने शोधली नामी शक्कल

Vaibhav Naik Politics :कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येवून युती करतील अशी चर्चा सुरू झाली होती. पण आता या युतीबाबत मुंबईत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली असून महत्वाची माहिती समोर आली आहे.
Uddhav Thackeray And Eknath Shinde
Uddhav Thackeray And Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही शिवसेना गट एकत्र येतील अशी चर्चा होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी या युतीला थेट नकार दिला.

  2. माजी आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले की, आगामी निवडणूक ‘शहर विकास आघाडी’च्या माध्यमातून लढवली जाणार आहे.

  3. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयामुळे शिंदे गट आणि भाजपविरुद्ध नवा राजकीय समीकरण उभं राहताना दिसत आहे.

Kanakavali News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती महाविकास आघाडीसह स्थानिक आघाड्या आता तयार होताना दिसत आहेत. अशातच कोल्हापूर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर रायगडमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली. नाशिकमध्ये काँग्रेसबरोबर मनसे गेली. यामुळे राज्यातील राजकारण नव्या वळणावर गेले असतानाच कणकवलीत दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती. तशा गुप्त बैठकाही झाल्या होत्या. त्यामुळे भाजपा रोखण्यासाठी मोठी रणनीती आखली जात असल्याचे समोर आले होते. पण ही युती प्रत्यक्षात उतरण्या अगोदरच याला पूर्णविराम लागला आहे. उद्धव ठाकरे यांनी थेट नाराजी व्यक्त करत शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको असे आदेश दिले आहेत. पण नामी शक्कल लढवत माजी आमदार वैभव नाईक या युतीच्या बाजूचे असल्याचे आता समोर आले आहे. यामुळे येथे दोन्ही शिवसेना आता एकत्र येणार का हे पाहाव लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदेंची शिवसेनेत राजकीय समीकरणांसाठी हालचालींना वेग आला होता. भाजपला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. यासाठी गुप्त बैठका झाल्या होत्या. याबाबत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजन तेली यांनी देखील काहीच गैर नाही म्हणत संमती दिली होती.

त्यांनी, भाजपला विरोध करणाऱ्या 'शहर विकास आघाडी'त फक्त ठाकरेंची शिवसेना नसून शहरातील इतर समाजसेवा करणारे मंडळे देखील आहेत. त्यामुळे प्रस्ताव एकट्या शिवसेनेचा नाही. शहरासाठी काम करणाऱ्या मंडळींचा आहे. शहराच्या विकासासाठी एकत्र येणे आणि शहरातील मंडळींनी जे मुद्दे मांडले आहे त्यावर विचार करणे काही गैर नाही. यात आम्ही भाजपला विरोध करतोय, असे नाही. तर शहराच्या विकासासाठी एकत्र येऊया अशी सगळ्यांची भूमिका आहे. त्यानुसार सर्वांनी भूमिका घेतली आहे. पण हा प्रस्तावाचा स्वीकार करायचा की नाही याचा निर्णय वरिष्ठ घेतील. त्याप्रमाणे आम्ही काम करू, असेही राजन तेली म्हणाले होते. म्हणजेच त्यांचा या आघाडीत सामील होण्याचा मानस होता.

Uddhav Thackeray And Eknath Shinde
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मराठवाडा दौरा संपवताच ओमराजेंवर दिली मोठी जबाबदारी

पण आता या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी, 'शिंदे गटासोबत कोणत्याही प्रकारची राजकीय भागीदारी केली जाणार नाही,' असे स्पष्टच आदेश दिले आहेत. तसेच शिंदे गटाव्यतिरिक्त कोणाशीही युती करण्याची भूमिका आधीच 'मातोश्री'वरून स्पष्ट केली होती, पण आता या प्रस्तावामुळे नवा वाद सुरू झाल्याने ठाकरेंनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे थेट नाराजी व्यक्त केली आहे. या घडामोडींमुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान याबाबत माजी आमदार वैभव नाईक यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी जर शहर विकास आघाडीत सामिल होणारे सर्व पक्ष आपल्या पक्षाचे चिन्ह बाजूला ठेवून एकत्र येत असतील तर आमचा त्याला पाठिंबा असेल असे त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात होणारी युती ही शिंदेंच्या शिवसेनेसोबत नसून ‘शहर विकास आघाडी’च्या स्वरूपात असेल, असे स्पष्टीकरण दिले आहे.

तसेच या आघाडीत सर्व पक्षांचा समावेश असेल आणि ही पक्षविरहित युती असेलतरच शहर विकास आघाडीच्या या प्रस्तावाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. त्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहमती दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता या नव्या ट्विस्टमुळे कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारण तापले असून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार, युती होणार या चर्चांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे येथील राजकीय समीकरणांना ता पुन्हा कलाटणी मिळणार असून शिवसेना जिल्हा प्रमुखांना पुन्हा नवी रणनीती आखावी लागणार आहे.

Uddhav Thackeray And Eknath Shinde
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर पाळत? 'मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या; मुंबई पोलिसांनी खरं कारण सांगितलं!

FAQs :

1. कणकवलीत दोन्ही शिवसेना एकत्र येणार आहेत का?
नाही, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासोबतची युती नाकारली आहे.

2. वैभव नाईक यांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे?
त्यांनी सांगितलं की निवडणूक ‘शहर विकास आघाडी’च्या बॅनरखाली लढवली जाईल.

3. उद्धव ठाकरेंनी युतीला नकार का दिला?
राजकीय मतभेद आणि तत्त्वांवरील भूमिका लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

4. भाजपविरोधात कोणते पक्ष एकत्र येत आहेत?
‘शहर विकास आघाडी’ अंतर्गत स्थानिक नेते भाजपविरोधात लढणार आहेत.

5. या निर्णयाचा निवडणुकीवर काय परिणाम होईल?
शहरात भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरण होण्याची शक्यता असून स्पर्धा त्रिकोणी होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com