Congress Politics : कोकणात काँग्रेस ठाकरेंना एकटं पाडणार? स्वबळाचं शिवधनुष्य ठाकरेंना पेलवणार?

Congress leader statment Over Local Body Election : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत असूनही ठाकरेंच्या बहुतांश जागा पडल्या. आता तळकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसने पुन्हा मोठी भूमिका घेतली आहे.
Congress Politics
Congress Politicssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. काँग्रेस नेते रमेश कीर यांनी रत्नागिरीतील कार्यकर्ता शिबिरात समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.

  2. या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे नवे राजकीय संकट उभे राहिले आहे.

  3. काँग्रेसची रणनिती महायुतीतील जागावाटपावर परिणाम करू शकते.

Ratnagiri News : राज्यात आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर महायुतीसह महाविकास आघाडील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अद्याप आघाडी आणि युतीबाबत कोणताच निर्णय राजकीय पक्षांकडून झालेला नाही. मात्र स्वबळाची चाचपणी महायुतीतील मित्र पक्षांसह मविआतील मित्र पक्षही करताना दिसत आहेत. यादरम्यान तळकोकणात काँग्रेसकडून मोठी घोषणा होण्याचे संकेत मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी याबाबत घोषणा केली असून त्यांनी, समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत असूनही उद्धव ठाकरे यांच्या बहुतांश जागा पडल्या. आता काँग्रेस स्वबळावर लढण्याचा इशारा देत आहे. यामुळे ठाकरेंसमोर मोठं आव्हान असणार आहे.

रत्नागिरीत पक्ष बांधणीच्यादृष्टीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यानंतर येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस निरीक्षक शशांक बावचकर, हुस्नबानू खलिफे, दक्षिण जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद आणि समन्वयक सुरेश कातकर यांची उपस्थिती होती.

या शिबिरात कीर बोलत होते. यावेळी कीर यांनी, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी काँग्रेसने केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे; मात्र समाधानकारक जागा न मिळाल्यास आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. स्थानिक पातळीवर तसे निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाने दिल्याचेही कीर यांनी म्हटले आहे.

Congress Politics
Congress Politics: गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेसला 'या' राज्यात स्वत:चा मुख्यमंत्री करता आला नाही!

तळकोकणात ठाकरे यांची ताकद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं कमी केली आहे. ऑपरेशन टायगरमधून तळकोकणातील महत्वपूर्ण नेतेच शिवसेनेनं पळवली आहेत. तर भाजपने देखील मोठे पक्षप्रवेश घडवून आणले आहेत. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद मर्यादीत झाली आहे. अशातच कीर यांच्या या घोषणेमुळे ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे चिंता वाढली आहे.

रत्नागिरीतील स्थानिक प्रश्नांवर बोलताना कीर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी, ‘‘ जिल्ह्यात स्थानिक समस्या ‘जैसे थे’ असून कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचून स्थानिक प्रश्नांविषयी लोकांचे मत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्थानिक प्रश्नांबाबत काँग्रेस पक्ष म्हणून वेळोवेळी उपोषण आणि येथील शासकीय अधिकाऱ्यांचादेखील पाठपुरावा करत आहोत. मात्र, पालकमंत्री विकासात इतके गुंग आहेत की, त्यांना रस्त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही, असा उपरोधिक टोला कीर यांनी लगावला.

...निवडणुकीची रणनीती

रत्नागिरी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे या उद्देशाने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना आणि मते विचारात घेतली जातील. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरविली जाईल. काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने लढत आहेत. देशाच्या भविष्यासाठी आणि लोकशाही मूल्यांसाठी त्यांच्या लढ्याला तरुणांनी खंबीरपणे पाठिंबा दिला पाहिजे. तरुणांनी त्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे, असे निरीक्षक शशांक बावचकर यांनी सांगितले.

Congress Politics
Congress Politics: युवा नेत्याकडे माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाची धुरा; खचलेल्या काँग्रेस पक्षाला चांगले दिवस दाखवणार ?

FAQs :

प्र.१: रमेश कीर यांनी काय वक्तव्य केले?
उ: समाधानकारक जागा न मिळाल्यास काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे संकेत दिले.

प्र.२: हे वक्तव्य कुठे केले गेले?
उ: रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात.

प्र.३: या वक्तव्यामुळे कोणाला अडचण होऊ शकते?
उ: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर नवे संकट उभे राहू शकते.

प्र.४: काँग्रेसची भूमिका काय आहे?
उ: जागा वाटपात अन्याय झाल्यास स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी.

प्र.५: या वक्तव्याचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
उ: महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेत तणाव वाढू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com