माजी आमदार दळवींच्या नाराजीची 'मातोश्री'कडून दखल; राष्ट्रवादीतील प्रवेश रोखला

माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या नाराजीची उद्धव ठाकरेंनी घेतली दखल
Suryakant Dalvi
Suryakant Dalvisarkarnama
Published on
Updated on

दाभोळ : दापोलीचे शिवसेनेचे (shivsena)माजी आमदार सूर्यकांत दळवी व त्यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्याची दखल थेट ‘मातोश्री’ने घेतल्याने दळवींसह त्यांच्या समर्थकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला तूर्तास विराम मिळाल्याचे चित्र दिसत आहे. (Uddhav Thackeray took notice of former MLA Suryakant Dalvi's displeasure)

माजी आमदार सूर्यकांत दळवी हे सध्या मुंबईत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दापोलीतील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना राष्ट्रवादीत येण्यासाठी गळ घातली आहे. मात्र, दळवींचा राष्ट्रवादीतील प्रवेश सध्या तरी टळला आहे. मात्र, त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. त्यांना शिवसेनेत पुन्हा सक्रिय करण्यासाठी दळवी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे चर्चा करत असून त्याला यश आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांचा राष्ट्रवादीतील प्रवेश तूर्त थांबविण्यात दळवी यांना यश आले आहे. दळवी समर्थकांना शिवसेनेत पुन्हा मानाची पदे मिळावीत, अशी त्यांची मागणी असून ही मागणी मान्य झाल्यास ही मंडळी शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्यास तयार आहेत.

Suryakant Dalvi
शिवसेनेत पदाधिकारी निवडीवरून भूकंप; ५८ पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्ष सोडण्याचा इशारा

मागील काळात दळवी हे भाजपत जाणार अशी चर्चा होती. त्यानंतर दळवी हे राष्ट्रवादीत जाणार, अशा बातम्या पसरल्या होत्या. पण, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी त्याचा इन्कार केला आहे. दळवी समर्थकांचा १ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सोहळा होणार होता. मात्र, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला नसला तरी शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेल्यानंतर दापोली मतदार संघातील होणारी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना थोपविण्यासाठी योग्य ते आश्वासन मिळाल्याने हा प्रवेश थांबला आहे, असे समजते.

Suryakant Dalvi
पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या सत्काराला विनयभंगातील आरोपी व्यासपीठावर!

दापोली विधानसभा मतदारसंघात सूर्यकांत दळवी यांचे २५ वर्षे वर्चस्व होते. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनी पराभव केला होता. त्यानंतर काही महिने ते राजकीय विजनवासात गेले. काही महिन्यांनी शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांना दापोली विधानसभा मतदारसंघात आणले. योगेश कदम यांनी मतदारसंघात दौरे सुरु केले. रामदास कदम यांनी विविध खात्यांचा निधी दापोली विधानसभा मतदारसंघात आणला. शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी त्यावेळी दळवींची साथ सोडून योगेश कदम यांना मिळाले होते.

त्यानंतर सूर्यकांत दळवींचे महत्त्व कमी झाले

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजय कदम यांचा शिवसेनेचे योगेश कदम यांनी प्रभाव केल्यावर दापोली विधानसभा मतदारसंघावर योगेश कदम यांचा एकछत्री अंमल सुरू झाला आहे. दळवी यांना मानणारे फार कमी समर्थक उरले आहेत. संघटनेतील त्यांचे स्थानही कमी झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com