राज ठाकरेंनी जुन्या शिलेदाराची हकालपट्टी करताच भाजपने डाव साधला? मोठ्या नेत्याला दिली जबाबदारी, अजितदादांच्या शिलेदारानेही फोन फिरवला?

Ratnagiri Vaibhhav Khedekar News : तळ कोकणात सध्या आगामी स्थानिकसाठी जोरदार तयारी राजकीय पक्ष करत आहेत. महायुतीतील तिन्ही पक्ष नव्या चेहऱ्यांना रेड कार्पेट हाथरत असतानाच मनसेकडून प्रवाहाच्या उलटा निर्णय घेतला जातोय. तळ कोकणातील मोठ्या नेत्यांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय.
Vaibhav Khedekar, Raj Thackeray
Vaibhav Khedekar, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वैभव खेडेकर यांच्यासह तीन पदाधिकाऱ्यांना निलंबित केले.

  2. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या नेत्यांना आपल्या गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

  3. आता खेडेकर कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ratnagiri News : तळ कोकणासह राज्याभर सध्या आगामी स्थानिकचे पडघम वाजत आहेत. महायुतीत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाले असून महाविकास आघाडीतील पक्षांना गळती लागली आहे. तर महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं वैभव खेडेकर यांच्यासह तीन एक पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. फक्त काही नेत्यांशी भेटण्याच्या कारणावरून राज ठाकरे यांनी तळ कोकणात मनसे वाढवणाऱ्या खेडेकरांवरच थेट पक्षातून निलंबणाची कारवाई केली. ही कारवाई होताच त्यांनी आपल्या मनातील खदखद पत्रकार परिषदेत मांडली. तसेच हीच का माझ्या कार्याची पोच पावती असा सवाल ही थेट राज ठाकरेंना केला होता. तसेच लवकरच आपण आपली राजकीय भूमिका स्पष्ट करू असेही म्हटले होते. ही पत्रकार परिषद होताच भाजपने टाईमिंग साधली आहे. एका बड्या नेत्यालाच खेडेकर यांच्यासह कारवाई झालेल्या त्या शिलेदारांना आपल्याकडे घ्या असे आदेश दिले आहेत. अजितदादांच्या आमदारानेही फोनवर चर्चा करत राष्ट्रवादीची ऑफर दिल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंनी अविश्वास दाखवलेला हा शिलेदार कोणत्या पक्षाचा झेंडा घेता हेच पाहावं लागणार आहे.

तळ कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या पक्ष वाढीची स्पर्धा सुरू आहे. नुकताच चिपळूनमधील प्रशांत यादव यांना आपल्या पक्षात खेचण्यावरून उदय सामंत आणि नितेश राणे यांच्यात रस्सीखेद दिसून आली होती. तसेच शाब्दीक वाद ही उफाळला होता. त्यामुळे ते कोणाकडे जातात याची उत्सुकता जिल्ह्याला लागली असतानाच त्यांनी हातात कमळ घेत शतप्रतिशत जिल्हा भाजपमय करू असा नारा दिला आहे.

Vaibhav Khedekar, Raj Thackeray
Vaibhav Khedekar: कोकणात लवकरच मोठा राजकीय भूकंंप? खळबळ उडवून देणाऱ्या स्टेटसनंतर वैभव खेडेकरांचं मोठं विधान; म्हणाले,होय...

जिल्ह्यात एक मोठा नेत्या भाजपच्या गळाला लागल्यानंतर आता पुन्हा आयती संधी मनसेनं खेडेकर यांच्या रूपाने दिली आहे. त्यामुळे या संधीचे सोनं करण्यासाठी भाजपसह आता अजित पवार यांची राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे. राज ठाकरे यांनी खेडेकर यांच्यासह तीन एक जुन्या शिलेदाराची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर भाजपने गळ टाकण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे मंत्री मंत्री नितेश राणे यांनी पहिला फोन केल्याची माहिती खेडेकर यांनीच पत्रकार परिषदेत दिलीय.

तसेच आमदार शेखर निकम यांनी फोन केला. माजी आमदार संजय कदम यांचाही फोन गेल्याचे खेडेकर यांनी सांगितले. तर आमच्या कोकणातील ही राजकीय संस्कृती असून या सर्वांनी धीर देण्याचं काम केल्याचे ते म्हणाले. त्यावेळी त्यांनी, मनसे तळागाळापर्यंत जावी, मतदारसंघात मनसेचा आमदार व्हावा यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न केला. आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्याशी पंगा घेतला.

पण बाजू न ऐकताच मला निलंबित करून अशा पद्धतीने निष्ठेचं फळ पक्षाने दिल्याचे ते खेडेकर यांनी म्हटले. पक्षाने जी कारवाई केली त्यानंतर आता माझ्या सहकाऱ्यांशी लवकर चर्चा करणार असून राजकीय निर्णय घेऊ असेही खेडेकर यांनी यावेळी सांगितले. तर मनसे पक्ष वाढावा ही माझी धडपड होती पण आता मनसेचं इंजिन आज इथेच थांबल्याचे खेडेकर यांनी म्हटले.

त्यांच्यासह अविनाश सौंदळकर (राजापूर), संतोष नलावडे (चिपळूण) सुबोध जाधव (माणगाव) या पदाधिकाऱ्यांवर पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन आणि पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत पक्षातून काढल्याचे पत्र पाठवण्यात आले होते. दरम्यान, आता खेडकर कोणती राजकीय भूमिका घेतात? तेही भाजपमध्ये जातात की अजित पवार यांचे घड्याळ हाती बांधतात की कोणता वेगळा विचार करतात हे पाहावं लागणार आहे.

Vaibhav Khedekar, Raj Thackeray
Pooja Khedekar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरचं 'नगर कनेक्शन!'; 'त्या' 2 IMP प्रमाणपत्रांबाबत धक्कादायक माहिती समोर

FAQs :

प्र.१. वैभव खेडेकर यांना मनसेनं का निलंबित केलं?
उ. पक्षविरोधी कामकाज आणि नेतृत्वावरील अविश्वासामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

प्र.२. भाजप आणि राष्ट्रवादी खेडेकरांना का बोलावत आहेत?
उ. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेडेकरांचा प्रभावी मतदारसंघ असल्याने त्यांना आपल्या गळाला लावण्याची स्पर्धा सुरू आहे.

प्र.३. खेडेकर कोणत्या पक्षात जाण्याची शक्यता आहे?
उ. अद्याप त्यांनी निर्णय जाहीर केलेला नाही; मात्र भाजप व राष्ट्रवादी दोघेही त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com