Vasai virar politics : भाजपला धक्का! आगरी सेनेला मोठे खिंडार पाडत बड्या नेत्याचा राजीनामा, शेकडो कार्यकर्त्यांसह 'बविआ'मध्ये प्रवेश

bjp alliance shock in Vasai virar : वसई-विरार राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून आगरी सेनेच्या बड्या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला आहे.
Vasai virar politics; ravindra chavan and former MLA Hitendra Thakur
Vasai virar politics; ravindra chavan and former MLA Hitendra Thakursarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. वसई-विरारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून आगरी सेनेचे जिल्हा प्रवक्ते जयेश पाटील यांनी राजीनामा दिला.

  2. त्यांनी अधिकृतपणे बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला असून त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही सामील झाले.

  3. या प्रवेशामुळे भाजपच्या युतीला मोठा धक्का मानला जात असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

vasai virar political News : वसई-विरार महानगरपालिकेत सलग सत्ता मिळवत माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या २०२४ मधील पराभवाचा वचपा काढला आहे. बहुजन विकास आघाडीने बाजी मारत बहुमताचा आकडा पार करत भाजपला रोखले आहे. अशातच आता पुन्हा एकदा भाजपला येथे मोठा धक्का बसला असून भाजपसोबत युतीत असलेल्या आगरी सेनेला मोठे खिंडार पडले आहे.

आगरी सेनेचे पालघर जिल्हा प्रवक्ते जयेश पाटील यांनी राजीनामा देत बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बविआचा झेंडा हातात घेतल्याने थेट भाजपलाच धक्का बसल्याचे मानले जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून वसई-विरारच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.

नुकताच राज्यातील महानगरपालिकेंच्या निवडणुका पार पडल्या असून येथे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने बाजी मारली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बविआने सर्वाधिक जागा जिंकत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या २९ वॉर्ड सदस्यांसाठीच्या ११५ जागांसाठी निवडणूक झाली. निकालानंतर येथे सर्वाधिक ७१ जागा बविआ, भाजपने ४२ आणि इतरांनी ३ जागा जिंकल्या होत्या. येथे बविआ विरोधात भाजप आणि आगरी सेनेनं युती केली होती. पण या युतीचा काही उपयोग झाला नाही. भाजप आणि इतर पक्षांचा पराभव करत बविआने सलग चौथ्यांदा सत्ता कायम ठेवली.

Vasai virar politics; ravindra chavan and former MLA Hitendra Thakur
Vasai-Virar Politics : वसई-विरार महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या प्रवीण शेट्टींच्या हाती! भाजपची माघार

यानंतर जयेश पाटील यांनी आपल्या आगरी सेनेच्या प्रवक्ता पदाचा राजीनामा दिला होता. तर त्यांच्या या राजीनाम्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 'बविआ'चा पर्याय निवडल्याचे समोर आले आहे.

यावेळी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत जयेश पाटील यांचा पक्षप्रवेश झाला. जयेश पाटील यांचा दांडगा जनसंपर्क असून आगरी समाजात त्यांचे नेटवर्क मजबूत आहे. यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी महत्वाचा ठरला आहे. तर भाजपसोबत असलेल्या आगरी सेनेत पडलेली फूट भाजपसाठी धक्का देणारी आहे.

या प्रवेशानंतर जयेश पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वसई-विरारच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निर्णय घेतल्याचे म्हटलं आहे. दरम्यान आता प्रवेशामुळे वसई-विरारच्या स्थानिक राजकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलणार असून भाजपला सेट बॅक असल्याचे बोलले जात आहे.

Vasai virar politics; ravindra chavan and former MLA Hitendra Thakur
Vasai Virar Politics : वसई-विरार पालिकेत तिजोरीच्या चाव्या कोणाकडे? प्रवीण शेट्टींचे नाव आघाडीवर, ठाकूरांच्या निर्णयाकडे लक्ष!

FAQs :

1. जयेश पाटील कोणत्या पक्षातून बाहेर पडले?
जयेश पाटील हे आगरी सेनेचे पालघर जिल्हा प्रवक्ते होते आणि त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला.

2. त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला.

3. त्यांच्या प्रवेशासोबत किती कार्यकर्ते सामील झाले?
त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही बविआमध्ये प्रवेश केला.

4. या राजकीय बदलाचा कोणत्या पक्षाला धक्का मानला जात आहे?
भाजपसोबत असलेल्या युतीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

5. ही घटना कुठल्या भागातील राजकारणाशी संबंधित आहे?
ही घटना वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यातील राजकारणाशी संबंधित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com