"मी यादी काढली तर सरकार अडचणीत येईल" : संभाजीराजे छत्रपती

Sambhajiraje Chhatrapati | Raigad | "मी सर्वांशी मिळून मिसळून राहतो, वागतो, बोलतो."
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

रायगड : "मी यादी काढली तर सरकार अडचणीत येईल" असे वक्तव्य खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केल्याने चर्चांना उधान आले आहे. आज मंत्रालयीन पत्रकार संघाच्या सदस्यांसोबत आज खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी किल्ले रायगडाची पहाणी केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

रायगड (Raigad) प्राधिकरणामार्फत केलेल्या बांधकामांबाबत निकृष्ट दर्जाचा आरोप स्थानिकांकडुन केला जात आहे. या विषयावर त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, जर का पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून काही चूका होत असतील तर त्याबाबत चौकशी व्हायलाच हवी. त्याबद्दल दुमत नाही. मात्र ९९ टक्के काम बरोबर झाले आहे. मग तुम्ही १ टक्क्यावरचं बोट ठेवणार का? असा सवालही त्यांनी केला.

Sambhajiraje Chhatrapati
राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले शिवसेनेतील मोठे नाव अडचणीत; बलात्काराचा गुन्हा दाखल

संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले, "शासनाकडून होणाऱ्या निधीची दिरंगाईमुळे येथील काम थांबते. त्यामुळे कधी पैसे येतात, इंजिनीअरची नेमणूक का केली नाही? या सगळ्याची मी जर लिस्ट काढली तर सरकार अडचणीत येईल. मी सर्वांशी मिळून मिसळून राहतो, वागतो, बोलतो."

Sambhajiraje Chhatrapati
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी सुधीर जोशी यांचे निधन

तसेच छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या किल्ल्याचे जतन, संवर्धनासाठी चालून आलेली संधी आहे. हा वन मॅन अजेंडा नाही हे समजून घ्या. अन्य ठिकाणी काय भानगडी चालल्या असतील परंतु रायगड किल्ल्याबाबत (raigad fort) खपवून घेतलं जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com