धक्कादायक: अपात्र लाडक्या बहिणींनी लाटले 165 कोटी; आदिती तटकरेंची कबुली; सरकारी लाभार्थ्यांकडून पैसे वसुल करणार

Aditi Tatkare statement on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांनी तब्बल 165 कोटी रुपये लाटले आहेत. सरकार तातडीने वसुलीची प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी हिवाळी अधिवेशनात दिली.
 Aditi Tatkare
Aditi TatkareSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra winter session 2025: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत तब्बल 165 कोटी रुपये अपात्र लाडक्या बहीणींनी लाटले असल्याची कबुली महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी हिवाळी अधिवेशनात दिली. तटकरे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही धक्कादायक माहिती मिळाली आहे.

१२ हजार ४३१ पुरुषांनी २५ कोटी रुपये तर ७७ हजार अपात्र महिलांनी १४० कोटी रुपये लाटले असल्याचे अदिती तटकरे यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. ९ हजार ५२६ शासकीय महिलांनी कर्मचाऱ्यांनी सुमारे साडेचौदा रुपये लाटले आहेत. शासकीय कर्मचारी , अधिकारी यांच्याकडून या पैशाची वसुली होणार का? असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे का? हे लवकरच समजेल.

सध्या नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारला असता आदिती तटकरे यांनी याबाबत लेखी उत्तर दिले आहे.अदिती तटकरे यांनी सांगितले की, सरकारी कर्मचारी आणि योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून ही रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधीमंडळात लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. या योजनेचे २६ लाख बोगस लाभार्थी असून सुमारे ५ हजार १३६ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

आमदार प्रज्ञा सातव, सतेज पाटील, अशोक जगताप, प्रवीण दरेकर आणि निरंजन डावखरे यांच्यासह इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अदिती तटकरे यांनी उत्तर दिले आहे. ज्या पुरुषांना पैसे मिळाले आहेत त्यांच्याकडून ही रक्कम परत घेतली जाणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

 Aditi Tatkare
Shivraj Patil: राजकीय टीका अन् पाठीमागे विरोध करणे चाकूरकरांना जमलेच नाही..

आदिती तटकरे यांनी दिलेले लेखी उत्तर

  • लाडकी बहीण योजनेद्वारे अपात्र लाभार्थ्यांनी सुमारे ३५ कोटी रुपये घेतले.

  • योजनेत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा १,५००रुपयांचा भत्ता दिला जातो.

  • एकूण २६ लाख अपात्र लाभार्थी होते, त्यापैकी १,५२६ सरकारी कर्मचारी होते, ज्यांनी १४.५ कोटी रुपये घेतले. एकूण १४,२९८ पुरुषांनीही पैसे घेतले

कोणत्या कायद्यानुसार होणार कारवाई

महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कारवाई करून रक्कम वसूल करण्यासाठी संबंधित विभागाला कळवण्यात आले असल्याची माहिती तटकरे यांनी सभागृहात दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com