Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, दर महिन्याला 1500 हवेत ना? मग ही बातमी वाचाच!

CM Ladki Bahin Yojana Maharashtra : राज्य सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रत्येक पात्र बहिणीपर्यंत आर्थिक लाभ वेळेवर पोहोचावा यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे.
ladki bahin yojana
ladki bahin yojanaSarkarnama
Published on
Updated on

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रत्येक पात्र बहिणीपर्यंत आर्थिक लाभ वेळेवर पोहोचावा यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया 18 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून, या प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.” म्हणजेच, सर्व लाभार्थी महिलांनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.

ladki bahin yojana
Bachchu Kadu Protest : बच्चू कडूंचा कोणत्या मागण्यांसाठी महाएल्गार?

ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय योजनेचा हप्ता म्हणजे दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये पुढे मिळणार नाहीत. त्यामुळे अजूनही ज्यांनी ई-केवायसी केली नाही, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी.

ई-केवायसी प्रक्रिया कशी कराल?

  • सर्वप्रथम https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

  • मुखपृष्ठावर दिसणाऱ्या e-KYC बॅनरवर क्लिक करा.

  • आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरून “Send OTP” वर क्लिक करा.

  • मोबाईलवर आलेला OTP टाका आणि Submit करा.

  • प्रणाली तपासेल की तुमची KYC पूर्ण झाली आहे का.

  • जर नाही, तर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक भरून OTP प्रक्रिया पुन्हा पूर्ण करा.

  • शेवटी, जात प्रवर्ग निवडून दिलेल्या अटी व घोषणांना संमती द्या.

  • “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसल्यावर प्रक्रिया पूर्ण झाली असे समजा.

ladki bahin yojana
Pune Crime : पुणे हादरलं! आयटी इंजिनिअर निघाला अल-कायदाचा संशयित दहशतवादी; कोंढव्यात ATS ची मोठी कारवाई

काही महिलांना OTP संदर्भात अडचणी येत असल्याचं समोर आलं असलं तरी, महिला व बालविकास विभागाने त्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर होणार असल्याचं सांगितलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, उशीर नको! 18 नोव्हेंबरपूर्वी e-KYC पूर्ण करा आणि तुमचे 1500 रुपये दर महिन्याला खात्यात नियमित जमा होण्यासाठी तयारी करा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com