Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेबाबत नवी अपडेट! 26 लाख लाभार्थी...; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार कारवाई

Ladki Bahin Yojana: महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी (Physical Verification) उपलब्ध करुन दिलेली आहे.
ladki bahin yojana
ladki bahin yojanaSarkarnama
Published on
Updated on

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सोशल मीडियात पोस्ट करुन माहिती दिली आहे. त्यानुसार २६ लाख लाभार्थ्यांवर गडांतर येण्याची शक्यता आहे. पण याबाबत नेमकी काय माहिती समोर आली आहे? तसंच या अपात्र लाभार्थ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कारवाई करणार आहेत.

२६ लाख लाभार्थी अपात्र

आदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. या सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत.

त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी (Physical Verification) उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे.

ladki bahin yojana
Sadabhau Khot: "थार गाड्यांतून फिरणारे कॉर्पोरेट काम करणारे गोरक्षणाचं रॅकेट चालवतात"; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप

पात्र लाभार्थ्यांचं काय?

छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल, तसंच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूवर्वत सुरु राहील, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com