Ladki Bahin Yojana : निवडणुकीच्या धामधुमीत लाडक्या बहिणींचा संताप अनावर; पैसे मिळेनात, थेट रस्त्यावर उतरल्या...

Women Protest Over Payment Delay ladki bahin yojana : निवडणुकीच्या धामधुमीत लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळाल्याने महिलांचा संताप अनावर झाला असून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
Ladki bahin yojana
Ladki bahin yojanaSarkarnama
Published on
Updated on

महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठा असंतोष समोर येत आहे. अनेक महिन्यांपासून खात्यात पैसे जमा न झाल्याने राज्यातील हजारो महिला वैतागल्या असून, अखेर त्यांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला आहे. विशेषतः भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यांत या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी उघड झाल्या आहेत.

निवडणुकांच्या गडबडीत सरकारला बहिणींचा विसर? संतापलेल्या बहिणींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. नोव्हेंबर 2025 पासून अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झालेली नाही. काही महिलांची नावे अचानक यादीतून वगळण्यात आली, तर काहींना अपात्र ठरवण्यात आले. अनेकांनी वेळेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असतानाही पैसे न आल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

Ladki bahin yojana
NCP Symbol Dispute : राष्ट्रवादीचं 'घड्याळ' कुणाचं? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वीच 'तडजोडी'ची चर्चा; शरद पवार, अजितदादा एकत्र येणार?

या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील महिलांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने महिला एकत्र आल्या आणि राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. जवळपास दीड तास महामार्ग रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने दखल घ्यावी आणि तात्काळ पैसे जमा करावेत, अशी मागणी आंदोलक महिलांनी केली. मात्र ठोस आश्वासन न मिळाल्याने संताप अधिकच वाढला.

याआधी यवतमाळ जिल्ह्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. तीन-चार दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनीही यवतमाळच्या जिल्हा महिला बालविकास कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला होता.

Ladki bahin yojana
Thane mayor politics: एकनाथ शिंदेंनी मुंबईत महापौरपद मागताच भाजपने ठाण्यात नाक दाबले : 'एक' दावा सोडावा लागणार?

महिलांचे म्हणणे आहे की निवडणुका जवळ आल्या की सरकारला लाडक्या बहिणींची आठवण येते. निवडणूक आली की, सरकारला लाडक्या बहिणी आठवतात. निवडणूक संपताच या लाडक्या बहिणींचा विसर पडतो. आश्वासने दिली जातात, जाहिराती केल्या जातात; मात्र निवडणूक संपल्यानंतर या महिलांकडे दुर्लक्ष केले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com