Land Census: आता फक्त ३० दिवसांत होणार जमीन मोजणी; महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय

Chandrashekhar Bawankule: राज्य सरकारकडून राज्यातील शेतकरी आणि भूधारकासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता महसूल विभागाकडून फक्त तीस दिवसांमध्ये जमीन मोजणी केली जाणार आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात जमीन मोजणीची प्रक्रिया फक्त ३० दिवसात पूर्ण होणार आहे, या निर्णयामुळे राज्यातील लाखो जमीन मोजणी प्रकरणे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

ही मोजणी कऱण्यासाठी खासगी भूसंपादकाची नियुक्ती कऱण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. अनेक वर्षांपासून जमीन मोजणीसाठी नागरिकांना ताटकळत राहावे लागत होते, या निर्णयामुळे ही प्रक्रिया आता गतिमान होणार आहे.

महसूल विभाग आणि भूअभिलेख विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. संयुक्त भूसंपादन मोजणी, पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सिमांकन आणि मालकीहक्कासाठी मोजणी प्रक्रिया गरजेची असते. याच मोजणी प्रकरणांचा 30 दिवसांत निपटारा करण्यासाठी परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Chandrashekhar Bawankule
Shiv Sena Dussehra Melava: दसरा मेळाव्यांतून नव्या वादाला फोडणी

शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

  • जमीन नोंदणी जलदगतीने होईल

  • जमीन नोंदीतील चुकांचे निराकरण सुलभ होईल

  • बँक कर्ज आणि विमा प्रक्रियेत अडचणी कमी होतील

  • डिजिटल सातबारा आणि मालकी हक्क प्रमाणपत्र सहज मिळेल

  • जमीन मोजणी प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयाच्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल.

  • पूर्वीसारख्या कार्यालयाता खेटा मारण्याची गरज नाही. एका क्लिकवर काही कागदपत्रांसह शुल्क भरून जमीन मोजणीसाठी अर्ज करता येतो.

  • केवळ 200 रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय मंत्री बावनकुळेंनी घेतला.

📊 FAQ — लोकांच्या मनातील प्रश्न

1. भूमी सर्वेक्षण ३० दिवसांत कसे पूर्ण होणार?

महसूल आणि भूअभिलेख विभाग आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एकत्रित मोहीम राबवणार आहेत.

2. शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होईल?

डिजिटल जमीन नोंदीमुळे मालकी हक्काचे प्रमाणपत्र, सातबारा उतारे आणि बँक व्यवहार सोपे होतील.

3. डिजिटल जमीन नोंदी कुठे पाहता येतील?

महाराष्ट्र सरकारच्या mahabhumi.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन जमीन नोंदी पाहता येतील.

4. बावनकुळे यांचा या प्रकल्पाशी काय संबंध आहे?

ते महसूल क्षेत्रातील अनुभवी असून या प्रकल्पाच्या प्रगतीवर वैयक्तिक देखरेख ठेवत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com