लताचा आवाज म्हणजे मानवी ध्वनीसृष्टीतील एक अद्भुत चमत्कार; आचार्य अत्रेंचे ते पत्र पुन्हा चर्चेत

सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीची नुपूरांची झुणझुण नि कृष्णाच्या मुरलीचा साद हे सर्व एकवटून विधात्यानं लताचा कंठ घडविला असला पाहिजे. ( Let. Lata Mangeshkar)
P.k. Atre- Lata Mangeshkar
P.k. Atre- Lata MangeshkarSarkarnama
Published on
Updated on

पुणे : गानकोकिळा, स्वरसाम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन जगभरातील रसिकांना धक्का देवून गेले. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची महानता, त्यांचे गायन आणि त्याला दिली जाणारी साद, अभिवादन, अभिनंदन कसे असावे, (Pune) याबद्दल आचार्य अत्रे यांनी फारपुर्वी `स्वरलता`, या आपल्या पत्रातून लिहून ठेवले होते. (Maharashtra)

एकंदरित लतादीदींचे गायन, त्यांचा अवाज पाहता ज्या पद्धतीने त्यांचे अभिनंदन केले जात होते, ते किती संकुचित किंवा त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेसे नाही, तर मग त्यांना साजेसे असे लतादीदींच अभिनंदन करायचे असेल तर काय अपेक्षित आहे, हे अत्रे यांनी आपल्या लेखणीतून मांडले होते. लतादीदींच्या निधनानंतर अत्रे यांचे ते पत्र पुन्हा एकदा चर्चेत आले असून सोशल मिडियावर ते व्हायरल होत आहे.

आचार्य अत्रे यांनी लतादीदींचे वर्णन करतांना म्हटले होते,``स्वर्गीय स्वरमाधुर्यांचा मूर्तिमंत अवतार असलेल्या लताचे केवळ लोखंडाच्या निफातून उतरलेल्या शाईच्या शब्दांनी, वृत्तपत्राच्या जाड्याभरड्या कागदावर, अभिनंदन करणे म्हणजे स्वरसाम्राज्ञीच्या स्वागतासाठी तिचा चरणाखाली जाड्या भरडया गोणपाटांच्या पायघड्या अंथरण्याइतंक विशोभित आहे.

लताच्या कंठातील अलौकिक कोमलतेला साजेसं अभिवादन करायचं तर त्यासाठी प्रभात काळची कोवळी सुवर्णकिरणं दवबिंदूमध्ये भिजवून बनवलेल्या शाईने, कमलतंतूच्या लेखणीने आणि वायूलहरीच्या हलक्या हातानं, फुलपाखरांच्या पंखावर लिहलेलं मानपत्र गुलाबकळीच्या करंडातून तिला अर्पण करायला हवं. लताचा आवाज म्हणजे मानवी ध्वनीसृष्टीतील एक अद्भुत चमत्कार आहे.

P.k. Atre- Lata Mangeshkar
Lata Mangeshkar लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान मुंबईत येणार

सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीची नुपूरांची झुणझुण नि कृष्णाच्या मुरलीचा साद हे सर्व एकवटून विधात्यानं लताचा कंठ घडविला असला पाहिजे`` अशा शब्दात आचार्य अत्रे यांनी लता मंगेशकर यांचे वर्णन केले होते. गाणसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अवघ्या जगावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संपुर्ण देश निशब्द, अबोल झाला आहे, त्यांच्या आठवणी आणि गायनाच्या आठवणीसह शोक सागरात बुडाला आहे. अशावेळी आचार्य अत्रे यांनी लतादीदींच्या गायनाचे कौतुक करत त्यांच्या उचित सन्मान कसा असावा? याचे वर्णन केलेले `स्वरलता`, हे पत्र सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com