Laxman Hake Video : लक्ष्मण हाकेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ, '***खोर ओबीसीच्या मुलांना...'

Laxman Hake Ajit Pawar Controversy : पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे ओबीसींच्या विद्यार्थ्यांना निधी मिळत नसल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गिरीगाव चौपाटीवर हाके यांनी आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी अजित पवारांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले.
Laxman Hake lashes out at Deputy CM Ajit Pawar during a fiery speech, triggering political outrage.
Laxman Hake lashes out at Deputy CM Ajit Pawar during a fiery speech, triggering political outrage. sarkarnama
Published on
Updated on

Laxman Hake Vs Ajit Pawar : ओबीसी आंदोलन हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत असतात. मात्र, गुरुवारी (ता.3) गिरगाव चौपटी येथे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त मिळत नसल्याच्या कारणाने जलसमाधीचे आंदोलन करत असताना हाके यांची अजित पवारांनावर टीका करत असताना जीभ घसरली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी माध्यमांच्या समोरच अजित पवारा यांना उद्देशून शिवीगाळ केली.

'हा अजित पवार आमच्या पोरांना शिकून देत नाही.***खोर आमच्या महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही. मराठा विद्यार्थ्यांना, सारथीला निधी दिला जातो पण महाज्योतीला निधी दिला जात नाही. ओबीसी मुलांवर अन्याय केला जातो.', असे हाके म्हणाले.

पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे ओबीसींच्या विद्यार्थ्यांना निधी मिळत नसल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गिरीगाव चौपाटीवर हाके आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलनासाठी लक्ष्मण हाके हे समुद्रात खोलपर्यंत गेले. भरतीची वेळ असल्याने अपघात घडण्याचा धोका होता.

Laxman Hake lashes out at Deputy CM Ajit Pawar during a fiery speech, triggering political outrage.
MNS Vs BJP : 'बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, कानाखाली बसेल...' भाजप आमदाराला मनसेचा थेट इशारा

पोलिसांनी धोका ओळखवून आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले. समुद्रातून हाके यांना उचलून पोलिसांनी बाहेर काढले. त्यांना गाडीत बसवत असताना त्यांनी अजित पवारांच्या विरोधात शिवीगाळ केली.

हाकेंच्या चॅटींगचा स्क्रिनशाॅट दाखवला

लक्ष्मण हाके मुंबईत आंदोलन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाकेंच्या चॅटींचा स्क्रिनशाॅट शेअर केला. त्यामध्ये ते बंडु काशीद यांना आक्षेपार्ह मेसेज केला आहे. त्यावर मिटकरी यांनी ट्विटमध्ये झाकणझुल्याची भाषा आणि भाषेचा स्तर बघा अशी टीका केली आहे.

Laxman Hake lashes out at Deputy CM Ajit Pawar during a fiery speech, triggering political outrage.
Uddhav-Raj Thackeray Alliance : ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजप-शिंदेंना धसका... घाम फोडणारा मुंबईचा अंदाज समोर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com