Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट; राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश

Maharashtra Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुमारे 676 निवडणुका मागील 5 वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र,निवडणूक आयोगाला या सर्वच रखडलेल्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यासाठी तब्बल 6 लाख 50 हजार ईव्हीएम मशीनची आवश्यकता भासणार आहे.
Maharashtra Local Body Elections
Maharashtra Local Body Elections Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुकांना आता गेल्या 5 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. राज्यात सर्वत्र आता जिल्हा परिषदा,पंचायत समिती,नगर पालिका,महापालिका निवडणुकां जोरदार वारे वाहू लागले आहे. या निवडणुकांच्या घोषणेकडे लक्ष लागलेले असतानाच आता निवडणूक आयोगानं (Election Commission) मोठी अपडेट दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतचीच मतदारयादी वापरण्यासंबंधीचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. याचदरम्यान, आता पुढील काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह महापालिका निवडणुकाही तीन टप्प्यांत होण्याची शक्यता समोर आली आहे.

राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्यात आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्यातील बैठक पार पडली आहे.

या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत घेण्याच्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानं जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही इच्छुकांसह सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Maharashtra Local Body Elections
NCP Politics : मुश्रीफांचा खंदा समर्थक विधानपरिषदेत जाण्याच्या तयारीत, अजितदादांना भेटून पुणे पदवीधरची फिल्डिंग लावली

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात झाली. नगरविकास विभागाने महापालिका,नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे निवडणुका दिवाळीनंतर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारी स्तरावरील या घडामोडींमुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले आहे.

येत्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच प्रभाग रचना पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे. 9 टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान मुंबई महापालिका, राज्यातील अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Local Body Elections
Elections Survey : निवडणूक सर्व्हेत काँग्रेसला सत्ता, भाजपची धुळधाण; पण शशी थरूर गेम फिरवणार?

राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभाग रचना पूर्ण केली जाणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुमारे 676 निवडणुका मागील 5 वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र, निवडणूक आयोगाला या सर्वच रखडलेल्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यासाठी तब्बल 6 लाख 50 हजार ईव्हीएम मशीनची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे अपुऱ्या ईव्हीएम संख्येमुळे एकाच टप्प्यात मतदान घेण्याची शक्यता सध्यातरी कठीण आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयोग तीन टप्प्यांत घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com