Lok Sabha 2024 News : अभय पाटलांचे ‘आरएसएस’शी संबंध, भाजपकडे पाठवला होता उमेदवारी अर्ज? 'वंचित'चा बॉम्ब

Dr. Abhay Patil News : अभय पाटील हे अकोल्यातील काँग्रेसचे उमेदवार आहेत. याच मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Abhay Patil photo and Post
Abhay Patil photo and PostSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024 News) रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बॉम्ब टाकला. अकोल्यातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी भाजपकडे उमेदवारी अर्ज पाठवला होता?, असा दावा वंचितने केला आहे. तसेच पाटलांचा आरएसएसशी घनिष्ट संबंध राहिला आहे, असे म्हणत ‘वंचित’कडून प्रवीण तोगडियांसोबतचा एक फोटो आणि एक फेसबुक पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे.

‘वंचित’कडून (Vanchit Bahujan Aghadi) आज एक्स हँडलवर दोन पोस्ट करून नाना पटोलेंवर (Nana Patole) थेट निशाणा साधला आहे. पहिल्या पोस्टमध्ये काँग्रेस (Congress) आणि आमच्या नात्यांत फूट पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप वंचितने केला होता. त्यानंतर दुसऱ्या पोस्टमध्ये अभय पाटील (Abhay Patil) यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत त्यांना टार्गेट केले आहे.

Abhay Patil photo and Post
Don Arun Gawli : 'डॅडी' पुन्हा तुरुंगाबाहेर येणार, पण...!

काय म्हटलंय वंचितने?

वंचितच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला माहिती आहे का, अकोल्यातील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी भाजपकडे (BJP) उमेदवारी अर्ज पाठवला होता? अभय पाटील आणि त्यांचे दिवंगत वडील दोघांचाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैयक्तिक आणि घनिष्ट संबंध राहिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्हाला याचे आश्चर्य वाटले नाही. कारण नाना पटोले यांची पसंतच अशी आहे! चला, काही हरकत नाही. आम्ही अभय पाटील यांना त्यांच्या उमेदवारीबद्दल शुभेच्छा देतो. तुम्ही काहीही करा, अकोल्यातून तर हिम्मतवालाच विजयी होणार, असा विश्वासही या पोस्टमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

काल पटोलेंनी दिली होती ऑफर

उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत वेळ आहे. किती जागा पाहिजेत, याचा प्रस्ताव द्यावा. मी पुढाकार घेतो. पुढील लढाई सुरू होईल. मैदान सुरू झालं तर मग खूप मुद्दे आहेत, आयुधं आहेत, असेही पटोलेंनी काल अकोल्यामध्ये म्हटले होते.

वंचितची आजची पहिली पोस्ट

‘काल अकोला येथे जाऊन नाना पटोलेंनी जॉनी वॉकरची जबरदस्त अ‍ॅक्टिंग केली. जर तुम्हाला संविधान वाचवायचे आहे तर आमच्या प्रदेश उपाध्यक्ष ड़ॉ. पुंडकर यांना महाविकास आघाडीच्या मीटिंगपासून दीड तास बाहेर का ठेवले, हे नाना पटोलेंनी सांगावे,’ असे वंचितने म्हटले आहे.

R

Abhay Patil photo and Post
Dharashiv Lok Sabha 2024 News : वीस वर्षे, पाच निवडणुका अन् पाटील-राजेनिंबाळकर टोकाचा संघर्ष !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com