Lok Sabha Elections 2024: लोकसभेसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! 'हे' आहेत संभाव्य उमेदवार

Mahavikas Aghadi Allocating Seats Lok Sabha 2024:कोल्हापुरातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, तर सांगलीतून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारीही निश्‍चित झाल्याची माहिती आहे.
Uddhav Thackeray, Balasaheb Thorat, Sharad Pawar, Prakash Ambedkar
Uddhav Thackeray, Balasaheb Thorat, Sharad Pawar, Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur: लोकसभा निवडणुकांना (Lok Sabha Elections 2024) अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने आता जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यात आता जागावाटपामध्ये महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi Allocating Seats Lok Sabha 2024) आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील एकूण ११ जागावाटपाचे सूत्रही निश्‍चित झाले असल्याचे समजते. काही जागांवरील उमेदवारही निश्‍चित करण्यात आले आहेत. दोन दिवसांत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या नावांची व जागांची घोषणा करण्यात येणार आहे.

मराठवाड्यात काही जागांवर शिवसेना ठाकरे गट व वंचितमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या जागांचा तिढा सुटल्यानंतर येत्या दोन दिवसांत राज्यातील ४८ मतदारसंघांतील महाविकास आघाडीचे उमेदवार व पक्षनिहाय मिळालेल्या जागांची घोषणा करण्यात येणार आहे.

Uddhav Thackeray, Balasaheb Thorat, Sharad Pawar, Prakash Ambedkar
Ramdas Kadam: माझेही नाव रामदास कदम आहे...; भाजपला सज्जड दम; निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत वादाची ठिणगी

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्यावर; तर सांगली शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यावर एकमत झाल्याचे समजते. कोल्हापुरातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, तर सांगलीतून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारीही निश्‍चित झाल्याची माहिती आहे.

याबाबत बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘सिल्व्हर ओक’वर प्रत्यक्ष भेट झाली. या वेळी खासदार अनिल देसाई उपस्थित होते, तर वंचित आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात ऑनलाइन सहभागी झाले होते.

कोल्हापूरची जागा शिवसेनेने जिंकल्याने ती जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी ठाकरे आग्रही होते. शाहू महाराज यांना उमेदवारी द्या, पण जागा आम्हाला द्या अशीही तयारी त्यांनी दर्शवली होती. पण, स्वतः शाहू महाराज शिवसेनेच्या तिकिटावर लढायला तयार नाहीत आणि ठाकरे गटाकडे दुसरा कोण प्रबळ उमेदवार नाही, ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यास ठाकरे तयार झाल्याचे समजते.

महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार

  • पुणे - काँग्रेस - आमदार रवींद्र धंगेकर

  • मावळ - शिवसेना ठाकरे गट - माजी सभापती संजोग वाघेरे

  • शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’- खासदार डॉ. अमोल कोल्हे

  • बारामती - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’- खासदार सुप्रिया सुळे

  • सातारा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’- खासदार श्रीनिवास पाटील किंवा सारंग पाटील

  • सोलापूर - काँग्रेस - आमदार प्रणिती शिंदे

  • सांगली - शिवसेना- ठाकरे गट - चंद्रहार पाटील

  • हातकणंगले - स्वाभिमानीसाठी जागा सोडली

  • कोल्हापूर - काँग्रेस - श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

  • R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com