Election Commission News : इलेक्शन कमिशनकडून अकोला पोटनिवडणूक ‘निकाली’

Akola Bye-Election 2024 News : पोटनिवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी हायकोर्टात करण्यात आली होती. कोर्टाच्या आदेशानुसार आज आयोगाने त्यावर शिक्कामोर्तब केले.
Election Commission
Election CommissionSarkarnama

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, केवळ तीन महिन्यांसाठी काल मुंबई हायकोर्टाकडून ही निवडणूक रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावर निवडणूक आयोगाने (Election Commission News ) आज तातडीने निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिली. त्यामुळे अकोला पश्चिमची मतदारसंघाची निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.   

निवडणूक आयोगाकडून 28 मार्चला अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Akola Bye-Election 2024) नोटीफिकेशन जारी केले जाणार होते, तर 26 एप्रिल रोजी मतदान होते. निवडणुकीचा निकाल लोकसभेसोबतच (Lok Sabha Election 2024) म्हणजे चार जून रोजी जाहीर केला जाणार होता. आयोगाने 16 मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

Election Commission
Lok Sabha Election 2024 : महायुतीत संघर्षाची ठिणगी? नाशिकमधून भुजबळांच्या चर्चेने शिंदे गट संतप्त ; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट...

आयोगाने (Election Commission) निवडणूक जाहीर केल्यानंतर त्याविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्या. अनिल किलोर आणि न्या. एम. एस. जवळकर यांच्या खंडपीठाने मंगळवारी सुनावणी करताना ही निवडणूक रद्द करण्याचे आदेश दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनिल दुबे यांनी निवडणुकीला आव्हान दिले होते. विधानसभा निवडणुकीला एक वर्षाहून कमी कालावधी असताना पोटनिवडणूक घेता येत नसल्याची तरतूद कायद्यात असल्याचा दावा दुबे यांनी याचिकेत केला होता. त्यामुळे ही निवडणूक घेऊ नये, अशी मागणी दुबे यांनी याचिकेत केली होती.

पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आयोगाकडून निवडणूक घेण्यात आली नाही, हेही दुबे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. या दोन्ही मतदारसंघांत एक वर्षाहून अधिक काळापासून खासदार नाहीत. कोर्टाकडून या बाबींचा विचार करून केवळ तीन महिन्यांपासून जनतेच्या पैशांचा चुराडा नको, असे म्हणून निवडणूक रद्द केली.

कोर्टाच्या या आदेशानंतर निवडणूक आयोगाचे सचिव संजीव कुमार प्रसाद यांनी आज त्यावर शिक्कामोर्तब केले. निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रसाद यांनी दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील एकमेव पोटनिवडणूक होणार नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

R

Election Commission
Lok Sabha Election 2024 News : हातकणंगलेत नरके की शेट्टी, वंचितमुळे गणित फिस्कटलं !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com