Lok Sabha Election 2024 : आंबेडकर बंधू एकाच वेळी पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरणार...

Anandraj Ambedkar News : प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर हेसुद्धा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.
Prakash Ambedkar : Anandraj Ambedkar
Prakash Ambedkar : Anandraj AmbedkarSarkarnama

Maharashtra News : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीशी राजकीय समीकरण जमू न शकल्याने आता स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. यामुळे वंचितने आता राज्यातील बहुतांश जागेवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. स्वत: प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत, हे जवळपास निश्चित आहे. अशातच आता रिपब्लितन सेनेचे आनंदराज आंबेडकरही लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे सूतोवाच केले आहे. असे झाल्यास प्रथमच दोन आंबेडकर हे लोकसभेच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावताना दिसतील. (Latest Marathi News)

अकोला मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीही अकोला मतदारसंघातून निवडणूक लढवून अकोल्यातून खासदार झाले होते. आता प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनीसुद्धा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शड्डू ठोकणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे एकाचवेळी आंबेडकर बंधू लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar : Anandraj Ambedkar
Lok Sabha Election 2024 : महायुतीत बिनसलं? भाजप दवाबतंत्राचा वापर करतंय; शिंदे गटातील नेत्याचा आरोप

उमेदवारी अर्ज भरणार -

'सरकारनामा'शी बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, "अमरावतीतील सर्वसामान्य लोक, तेथील मतदार, स्थानिक जनता यांनी अमरावतीत नवा चेहरा म्हणून खासदार पाहिजे, असे ते म्हणाले. तेथील लोकांनी माझ्याशी संपर्क केला. मला निवडणुकीचा अर्ज भरण्यास विनंती केली. आम्ही आमरावतीकर जनता तुमच्यासोबत आहोत, असे त्यांनी मला सांगितले. यामुळे मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २ मे रोजी लोकसभा उमेदवारीसाठी फॅार्म भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिलीच निवडणूक -

रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी याआधी कधीही निवडणूक लढवलेली नाही. ते पहिल्यांदाच निवडणुकाच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्यासाठी ही पहिली निवडणूक असली तरी आपण निवडणुकीसाठी पूर्ण तयारीनिशी उतरलो असल्याचे ते सांगतात.

Prakash Ambedkar : Anandraj Ambedkar
Praniti Shinde Vs BJP : भाजपवाले आता माझं चारित्र्यहनन करतील; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा आहे का ?

या निवडणुकीत (ELection) प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न केल्यावर त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले की, प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझा तसा राजकीय संवाद होत नाही. मी स्वबळावर निवडणूक लढवत आहे. अद्याप कुणाचाही पाठिंबा घेतला नाही किंवा अद्याप कुणाचीही पाठिंबा मिळाला नाही, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.

वंचितच्याच कार्यकर्त्यांचा आग्रह -

अमरावती लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचितकडून प्राजक्ता पिल्लेवाण यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. यानंतर आता आनंदराज आंबेडकर या मतदारसंघात उतरल्यास आंबेडकरी मतांची विभागणी होऊ शकते, अशी शक्यता आहे. मात्र, ही बाब अनंदराज आंबेडकर यांनी फेटाळून लावली आहे.

Prakash Ambedkar : Anandraj Ambedkar
Solapur NCP : ‘वंचित’कडून लोकसभेची उमेदवारी; रमेश बारसकर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

"मला वंचितच्या कार्यकर्त्यांनीही निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराबाबत वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. मुळात आंबेडकर या नावाला वेगळे वलय आहे. आंबेडकर जेव्हा निवडणुकीत उभा राहतातत, तेव्हा संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी असतो. मग कोणत्याही पक्षाकडून उभे राहिले तरी त्याचा फारसा फरक पडत नाही," असे आंबेडकर म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com