Solapur NCP : ‘वंचित’कडून लोकसभेची उमेदवारी; रमेश बारसकर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफूट झाल्यानंतर मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील आणि प्रवक्ते उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. मात्र, बारसकर हे शरद पवार यांच्यासोबत कायम होते.
Ramesh Baraskar
Ramesh Baraskar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 1 April : वंचित बहुजन आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झालेले मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बारसकर यांनीही माढ्यातून उमेदवारीची मागणी केली होती.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवारीची दुसरी यादी रविवारी सायंकाळी जाहीर झाली. त्या यादीत माढा लोकसभा मतदारसंघासाठी (Madha Lok Sabha Constituency) वंचितकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फाटाफूट झाल्यानंतर मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील आणि प्रवक्ते उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. मात्र, बारसकर हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत कायम होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramesh Baraskar
Madha Lok Sabha Constituency : माढ्यात नवा ट्विस्ट; पवारांकडून प्रवीण गायकवाडांना तयारी करण्याची सूचना

रमेश बारसकर यांची वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. तसेच अलीकडच्या काळात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या संपर्कात आल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या आदेशानुसार बारसकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

बारसकर यांच्या हकालपट्टीबरोबरच त्यांनी नियुक्ती केलेली राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा कार्यालयीन सरचिटणीस महेश माने यांनी दिली आहे.

मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती : बारसकर

मी राष्ट्रवादी काँग्रेसकडे माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. ओबीसी आरक्षण बचाव मेळावा माढा लोकसभा मतदारसंघात घेण्यात आला होता, त्यातूनच माझी उमेदवारी निश्चित झाली होती. ती रविवारी जाहीर झाली. खासगीकरणामुळे अनेकांना नोकरी मिळत नाही. नोकरी मिळत नसल्याने अनेक तरुणांची लग्नं होऊ शकलेली नाहीत, त्यासंदर्भात आम्ही सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. माढ्यातील जनतेने विश्वास दाखवला तर तरुणांच्या रोजगारासंदर्भात संसदेत आवाज उठविण्यात येईल, असे रमेश बारसकर यांनी सांगितले.

R

Ramesh Baraskar
Madha Lok Sabha Constituency : मोहिते पाटलांची बंडखोरी गृहीत धरून भाजपची रणनीती; माढ्यात महाआघाडीचा उमेदवारीचा तिढा सुटणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com