Lok Sabha Election Results : शिव्या-शापाची मशीन 'ऑन'; राऊतांनी मोदी सरकारचा पाडाव करून टाकला...

Lok Sabha Election 2024 India Alliance Vs NDA Election 2024 Result General Lok Sabha Result Update : संजय राऊतांनी सामन्यातील अग्रलेखातून मोदींवर प्रहार केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात होण्याआधी त्याचीच चर्चा आहे.
Sanjay Raut, Narendra Modi
Sanjay Raut, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मोदींची खैर नाही, आता काही केल्या मोदी-शाहांचे सरकार पडणार, काँग्रेस सत्तेत येणार असल्याचे उर बडवून सांगणाऱ्या विरोधकांना 'एक्झिट पोल'च्या आकड्यांनी तोंड बंद ठेवण्याचे संकेतच दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या खेपेपेक्षा आता आणखी 4-5 डझन जागा (खासदार) जादा असतील, एक-दोन नव्हे जवळपास 10 संस्थांनी आकडे मांडले. त्यावरही हे 'एक्झिट पोल' फ्रॉड असल्याचे सांगून विरोधक स्वतःचे समाधान करीत आहेत. तरीही, मोदी पुन्हा दिल्ली काबीज करणार असल्याचे दिसूनही, मोदी-शहांना नेहमी शिव्या-शाप देणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामन्याच्या अग्रलेखातून मोदी सरकारचा पाडाव होणार असल्याचे जाहीर करून टाकले.

ढोंगी, फसव्या असे ठाकरी पोतडीतील (ठेवणीतील) शब्द बाहेर काढून राऊतांनी मोदी सरकारचा पराभव होऊन गंगा शुद्ध होईल... असेही अग्रलेखात बोलून दाखवले आहे. हा लेख शिळा होण्याआधीच म्हणजे मतमोजणीनंतरच्या काही तासांतच मोदी-शहा पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसण्याची दिमाखदार तयारी करतील. तोवर अर्थात, निकालानंर म्हणजे, बुधवारी राऊत पुन्हा अग्रलेखातून 'ईव्हीएम'चे पोस्टमार्टेन करीत आणि त्यातही कशी फसवणूक झाली, याचे तुणतुणे वाजवतील.

असो, मतमोजणीच्या गडबडीतही राऊतांच्या अग्रलेखाची रोजच्या इतकी नाही; पण थोडीफार तरी चर्चा झाली, याचे किचिंत का होईना राऊतांना समाधान असेन. निकालानंतर पुन्हा राऊत अग्रलेखांची सिरिज सुरू ठेवतीलच. तेव्हा ते नव्या सरकारला झोपडतील की कोडकौतुक करतील, याचा फैसला दुपारी 3 वाजेपर्यंत होईल.

दरम्यान, बहुतेक एक्झिट पोलने एनडीएला 360 हून अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. काँग्रेसचा सुपडा साफ होईल, इंडिया आघाडीचा प्रयोग फसणार, असे पोलमधून दिसून आले. निकालही असेच आल्यास नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील. विरोधकांनी मात्र, इंडियाला 295 पर्यंत जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

एक्झिट पोलचे अंदाज फारसे चुकले नसल्याचे मागील दोन लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून दिसून आले आहे. उलट पोलच्या अंदाजापेक्षा अधिक जागा मोदींच्या टीमला मिळाल्या होत्या. तर काँग्रेसच्या जागा अपेक्षेपेक्षा कमी झाल्या होत्या. ही परंपरा कायम राहिल्यास एनडीए 400 पारचाही आकडा पार करू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com