Lok Sabha Election 2024 : बाळा नांदगावकरांचा ‘या’ मतदारसंघात दोनदा पराभव; ठाकरे पुन्हा रिस्क घेणार का?

Bala Nandgaonkar News : बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आहेत. ठाकरेंनी शिवसेना सोडल्याच्या पहिल्या दिवसापासून नांदगावकर त्यांच्या सोबत आहेत.
Raj Thackeray, Bala Nandgaonkar
Raj Thackeray, Bala NandgaonkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. त्यानंतर मनसे महायुतीसोबत जाणार, अशी चर्चा सुरू झाली. दिल्लीतून शाहांचा निरोप घेऊन ठाकरे मुंबईत परतल्यानंतर आणखी एक बातमी बाहेर आली. ती म्हणजे, बाळा नांदगावकरांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभेचे (Lok Sabha Election 2024) तिकीट मिळणार. मनसेच्या नेत्यांकडूनच या चर्चेला तोंड फोडण्यात आले. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचा आढावा घेतला असता मनसेची ताकद किती, हे ठळकपणे पाहायला मिळते.

मनसे (MNS) महायुतीसोबत गेल्यानंतर मुंबईतील दक्षिण मुंबई मतदारसंघ त्यांना मिळू शकतो, अशी चर्चा आहे. या मतदारसंघात नांदगावकर (Bala Nandgaonkar) उमेदवार असतील, असेही बोलले जात आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतर 2009 मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत राज ठाकरेंनी बाळा नांदगावकरांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून तिकीट दिले. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेससह शिवसेनेच्या (Shiv Sena) उमेदवारालाही चांगलाच घाम गाळायला लावला. काँग्रेसचे (Congress) उमेदवार मिलिंद देवरा (Milind Deora) यांचा निवडणुकीत विजय झाला, पण नांदगावकरांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मागे टाकत झटका दिला.

Raj Thackeray, Bala Nandgaonkar
Ajit Pawar News : "...अन् तेव्हा अजित पवार मुख्यमंत्री होणार," उपमुख्यमंत्र्यांचं विधान

नांदगावकर दुसऱ्यांदा म्हणजे 2014 मध्येही याच मतदारसंघातून रिंगणात उतरले. या वेळी त्यांच्यासमोर शिवसेनेचे उमेदवार होते अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि देवरा काँग्रेसच्या तिकिटावर लढत होते, पण या वेळी नांदगावकरांची मते 2009 च्या तुलनेत जवळपास निम्म्याने कमी झाली. त्यांना केवळ 84 हजार मतांवर समाधान मानावे लागले. सावंतांनी 3 लाख 74 हजार मतं मिळवत देवरांचा दारुण पराभव केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सलग दोन निवडणुकांमध्ये मनसेचा एकही उमेदवार संसदेत पोहाेचला नाही. 2019 च्या निवडणुकीत मनसेने दक्षिण मुंबईसह एकाही मतदारसंघात उमेदवार उतरवला नाही. राज ठाकरेंनी या निवडणुकीत केंद्र व राज्य सरकारविरोधात ठिकठिकाणी सभा घेत वातावरण ढवळून काढले. या वेळी मात्र त्यांचा युतीसोबत जाण्याचा निर्णय पक्का झाल्याची चर्चा आहे. युतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल, कोणते मतदारसंघ मिळणार, कोण उमेदवार असणार, हे लवकरच समजेल.    

मागील तीन निवडणुकीतील दक्षिण मुंबई मतदारसंघाची स्थिती –

2009 - मिलिंद देवरा (काँग्रेस) - 2 लाख 72 हजार 411

बाळा नांदगावकर (मनसे) - 1 लाख 59 हजार 729

मोहन रावळे (शिवसेना) - 1 लाख 46 हजार 118

2014 - अरविंद सावंत (शिवसेना) - 3 लाख 74 हजार 780

मिलिंद देवरा (काँग्रेस) - 2 लाख 46 हजार 632

बाळा नांदगावकर (मनसे) - 84 हजार 864

2019 - अरविंद सावंत (शिवसेना) - 4 लाख 21 हजार 937

मिलिंद देवरा (काँग्रेस) - 3 लाख 21 हजार 870

R

Raj Thackeray, Bala Nandgaonkar
Loksabha Election 2024 News : ...म्हणून युगेंद्र पवारांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा घेराव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com