Ajit Pawar News : "...अन् तेव्हा अजित पवार मुख्यमंत्री होणार," उपमुख्यमंत्र्यांचं विधान

Ajit Pawar In Shirus Lok Sabha Constituency : शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी खेडमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
ajit pawar
ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Election 2024 ) घोषणा झाली. मात्र, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाला नाही. शिरूरच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेत संघर्ष सुरू होता. पण आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी आपली तलवार म्यान केल्यामुळे शिरूरमधून शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातच आज ( 20 मार्च ) अजित पवारांनी मोहिते-पाटलांच्या निवासस्थानी भेट दिली. यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवारांनी ( Ajit Pawar ) 'मुख्यमंत्रिपदाबाबत' केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव-पाटील ( Shivajirao Adhalrao Patil ) यांनी खासदारकी लढवण्याची तयारी केली आहे. पण, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षातून त्यांना विरोध होत होता. "आढळराव पाटलांना उमेदवारी दिली, तर मी वेगळा विचार करत विरोधात काम करेन," अशी भूमिका खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील ( Dilip Mohite Patil ) यांनी घेतली होती. "मी आढळराव-पाटलांबरोबर गेली 20 वर्षे संघर्ष करत आहे. त्यांना पाठिंबा देण्यापेक्षा घरी बसेन," असंही मोहिते-पाटलांनी म्हटलं. मात्र, अजित पवारांनी समजूत काढल्यानंतर मोहिते-पाटलांनी एक पाऊल मागे घेतलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यातच उपमुख्यमंत्री पवार ( Ajit Pawar ) हे अचानकपणे आज बुधवारी खेड तालुका दौऱ्यावर आले होते. त्यांनी खेडमध्ये आमदार मोहिते-पाटील यांच्या घरी भेट देऊन पाहुणचार घेतला. जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी, शिरूर मतदारसंघांतील कार्यकर्त्यांच्या बैठकाही अजित पवारांनी घेतल्या. बैठकीत पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

ajit pawar
Ajit Pawar News: अजितदादांना `शिरूर`ला एका दगडात मारायचे आहेत तीन पक्षी, पण नेम लागणार का?

या वेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यावर "जेव्हा दिलीप मोहिते-पाटील मंत्री होतील, तेव्हा मी मुख्यमंत्री होईल," अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अमोल कोल्हेंविरोधात आढळराव-पाटील मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावर कोल्हेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "पाच वर्षांपूर्वी आढळराव-पाटलांनी अजित पवारांना आव्हान दिलं होतं. आता आढळराव-पाटलांना उमेदवार करण्याचा हा विलक्षण योगायोग आला आहे. आढळराव-पाटलांना चौथ्या पक्ष बदलाच्या शुभेच्छा," असा चिमटा कोल्हेंनी काढला आहे.

R

ajit pawar
Ajit Pawar Ahmednagar News : नगर राष्ट्रवादीत 'ऑल इज नॉट वेल', लंके सोडून जाण्याच्या तयारीत असतानाच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com