Lok Sabha Election 2024: राज्यात धक्का कुणाला, युती की आघाडी? ओपिनियन पोलचा सर्वात मोठा कौल

Lok Sabha Election 2024: राज्यातील सर्व राजकीय उलथापालथ झाल्यानंतर मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं आहे. अशातच आता एका वृत्तवाहिनीने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यात अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता आहे.
Lok Sabha Election 2019 Opinion Poll
Lok Sabha Election 2019 Opinion PollSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2019 Opinion Poll: मोदींची गॅरंटी की शरद पवारांची (Sharad) राजकीय खेळी, देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnvis) शिष्टाई की उद्धव ठाकरेंबद्दलची सहानभुती. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाबद्दल जनतेच्या मनात नेमकं काय आहे. यावरतीच यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.

राज्यातील सर्व राजकीय उलथापालथ झाल्यानंतर मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं आहे. अशातच आता एका वृत्तवाहिनीने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यात अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता आहे.

राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. शिवसेनेचे (Shivsena) दोन गट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन भाग झाले आणि राज्यात महायुती तयार केली. तर शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची मिळून महाविकास आघाडी (MVA) अस्तित्वात राहिली. तर सध्या राज्यात महायुतीला (Mahayuti) भरघोस यश मिळेल असा दावा केला जात आहे, परंतु, ओपिनियन पोलनुसार महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळणार असल्याचा सर्व्हेचा निकाल समोर आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एका वृत्तवाहिनीने केलेल्या सर्व्हेनुसार लोकसभेच्या (Lok Sabha) एकूण 48 जागांपैकी 30 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीच्या 18 उमेदवारांचा विजय होऊ शकतो असा ओपिनियन पोलचा अंदाज आहे. तर बारामती (Baramati) माढा, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघात अनपेक्षित निकाल लागू शकतो.

ओपिनियन पोलनुसार लोकसभेचा निकाल पुढीलप्रमाणे

महायुतीतील भाजपला 21 ते 22 जागा, शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 9 ते 10 जागा, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा नाही.

आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 9 जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 5 आणि काँग्रेसला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रतिष्ठेची लढत म्हणून बारामती लोकसभेच्या निवडणुकीकडे पाहिलं जातं. या जागेवर ओपिनियन पोलनुसार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आघाडीवर आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत. बारामती लोकसभेसाठी शरद पवार गटाने आणि अजित पवार गटाने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. शिवाय पवार विरुद्ध पवार अशा या लढतीत नेमकं कोण विजयी होणार हे माहिती नसलं तरीही ओपिनियन पोलचे अंदाज मात्र अजितदादांसाठी अनुकूल नाहीत.

महायुतीला मिळणार 30 जागा

राज्यातील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचा 30 जागांवर विजय होऊ शकतो. यामध्ये भाजपला 21 ते 22, शिंदे गटाला 9 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Lok Sabha Election 2019 Opinion Poll
Maval Lok Sabha Constituency : रावणाची उपमा देत श्रीरंग बारणेंवर निशाणा; संजोग वाघेरे नेमके काय म्हणाले?

आघाडीत कोणाला किती जागा मिळणार?

लोकसभा निवडणुकीत आघाडीतील शरद पवार (Sharad Pawar) गटाला 5, काँग्रेसला 3, आणि ठाकरे गटाला 9 जागांवर विजय मिळू शकतो. काँग्रेसला गडचिरोली-चिमूर, नंदुरबार आणि नांदेडमध्ये यश मिळू शकते. तर शरद पवार गटाचा बारामती, सातारा आणि शिरुरच्या (Shirur) मतदारसंघांमध्ये विजय होऊ शकतो.

(Edited By Jagdish Patil)

Lok Sabha Election 2019 Opinion Poll
Vishal Patil News : जयंतरावांना विशालदादांनी करून दिली वसंतदादांच्या 'त्या' विधानाची आठवण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com