Raigad Pattern : उमेदवारांसाठी सर्वाधिक डोकेदुखीचा 'रायगड पॅटर्न'

Election 2024 : कुठलीही का निवडणुक असु द्या, राज्यातील 'रायगड पॅटर्न' हा प्रमुख दावेदार उमेदवारासाठी कायम डोकेदुखी निर्माण करतो. राज्यातील 'रायगड पॅटर्न' नेमका काय आहे.
Anant Geete files nomination
Anant Geete files nominationSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची सुरुवात झाली आहे. 12 एप्रिल पासुन या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल करणे सुरुवात झाली. त्यामुळे इच्छुकांनी आपले अर्ज विकत घेतले आणि ते दाखल करण्याची घाई सुध्दा केली आहे. प्रमुख राजकीय पक्षांना निवडणुकीत अडचणी आणि त्यात प्रमुख राजकीय नेते मंडळींना अडचणीत आणणे हे विरोधकांचे निवडणुकीत कर्तव्य असते. त्याचा फटका हा प्रमुख उमेदवारांना नेहमीच बसतो.

निवडणुकीत मतदानाच्या वेळी मतदारांना अडचणीचा 'रायगड पॅटर्न' (Raigad Pattern) आहे. हा रायगड पॅटर्न संपुर्ण निवडणुकीत कुठे ही प्रचार प्रसार करत नाही. पण, जेव्हा मतदारांना ईव्हिएमचे बटन दाबण्याची शेवटची वेळ असते. अगदी तेव्हा मात्र मतदारांना कन्फ्यूज करण्यासाठी या पॅटर्नचा फक्त रायगड येथे वापरला जातो. त्यातुन विरोधातील उमेदवाराला धक्का देण्याचे षडयंत्र अगदी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासुन आखले जाते. निवडणुकीत प्रमुख उमेदवार कोण असेल याची माहिती विरोधक काढतात. त्या प्रमुख उमेदवाराच्या नाम साधर्म्य असलेल्या व्यक्तीला निवडणुकीत उभे करण्यात येते आणि ती व्यक्ती मग काही मतदारांचे मते नामसाधर्म्यातून स्वतःकडे खेचते आणि त्याचा फटका हा प्रमुख पक्षातील उमेदवाराला बसतो. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Anant Geete files nomination
Raj Thackeray and Mahayuti : 'बिनशर्त' पाठिंबा दिला म्हणून कायर्कर्त्यांना मानसन्मान नाही?

'रायगड पॅटर्न' दर निवडणुकीत वापरला जातो, निवडणुकीत प्रमुख उमेदवाराला अडचणीत आणतो. तशा प्रकारच्या चाली थेट निवडणुकीत मतदानाच्या वेळी कामात येतात याची जाणीव रायगड येथील राजकीय नेत्यांना ज्ञात आहे. थेट मतदानाच्या वेळी मतदारांमध्ये कन्फ्यूजन करणे हे रायगड पॅटर्नचे प्रमुख लक्षण आहे. त्या आधारे अनेक दिग्गज नेत्यांना धुळ चारण्यात या 'रायगड पॅटर्न' ला व्यापक यश आले होते.

यंदा देखील त्याचा वापर करण्याचे षडयंत्र आखले जात आहे. तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुक होत असलेल्या रायगड लोकसभा मतदार संघात तीन अनंत गीते यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. आता अनंत गीते कोण असा प्रश्न पडला असेल तर एकाच नावाची तीन अनंत गीते यांचे अर्ज दाखल झाले आहे. माजी केद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते पुन्हा एकदा रायगड लोकसभा मतदार संघातून निवडणूकीला उभे राहिले आहेत. ते शिवसेना (उध्दव ठाकरे गट ) उमेदवार असून, इंडिया आघाडीने त्यांना पाठिंबा घोषित केला आहे. विरोधकांनी अनंत पद्मा गिते, आणि अनंत बाळोजी गीते नामक दोन अपक्ष उमेदवार निवडणूक मैदानात चालाखीने आणले आहे. आता तर अर्ज दाखल करण्याची सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तिथी पर्यंत नामसाधर्म्य असलेल्या अनेक उमेदवारांचे अर्ज दाखल असतील. प्रत्येक दिग्गज उमेदवारासाठी विरोधकच अशा डमी उमेदवारांचा शोध घेत त्यांना निवडणुकीत उभे करण्यात व्यस्त असते.

दिग्गजांना बसला याचा फटका

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमध्ये हा नामसाधर्म्याचा वापर परंपरागत पध्दतीने आता होणे सुरु झाले आहे. त्याची मोठी राजकीय अडचण प्रमुख उमेदवारांना होते. 2014 च्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांना याचा फटका बसला आहे. सुनिल तटकरे नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराला 9 हजार 849 मते मिळाली. तटकरे यांचा गीतेंकडून अवघ्या 2 हजार मतांनी पराभव झाला. 2004 च्या लोकसभा निवडणूकीत दोन ए. आर अंतुले नावाचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत बॅरीस्टर ए. आर अंतुले यांचा विजय झाला. पण, अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या डमी अंतुलेंना 23 हजार मते मिळाली होती. लोकसभा ईव्हीएम मशीनवर उमेदवारांचे नाव, पक्ष, त्याचे निवडणूक चिन्ह आणि फोटो देखील असतो. पण, अनेक मतदारांना नेमका उमेदवार माहित नसतो त्याच्या कन्फ्यूजनचा फायदा मात्र विरोधक घेण्याच्या तयारीत असतात. याचा सर्रास वापर रायगडमध्ये अतिशय हुशारीने केला जातो.

Anant Geete files nomination
PM Modi Interview : राम मंदिर, इलेक्टोरल बाॅण्ड, गुजरातचा विकास..! काय आहेत PM मोदींच्या मुलाखतीतले प्रमुख दावे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com