PM Modi Interview : राम मंदिर, इलेक्टोरल बाॅण्ड, गुजरातचा विकास..! काय आहेत PM मोदींच्या मुलाखतीतले प्रमुख दावे?

PM Modi Breaking Lok Sabha Election News : विकासासाठी तंदुरस्त स्पर्धा असायला हवी. मी मुख्यमंत्री असल्यापासून माझा एक मंत्र आहे, तो म्हणजे मला गुजरातचा विकास करायचा आहे. कारण...
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

PM Modi Interview 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांची घोषणा, अर्ज दाखल करण्याची धावपळ, बंडखोरी, प्रचार सभा, नाराजीनाट्य, भेटीगाठी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अशा सर्व घडामोडींमुळे राजकीय माहौल तयार असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) 'एएनआय'या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतानाच काही खळबळजनक दावेदेखील केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत देशाच्या विकासासाठी पुढच्या 25 वर्षांचा प्लॅन तयार असल्याचे स्पष्ट केले. तसेच आतापर्यंत झालेला विकास हा केवळ ट्रेलर होता. आगामी काळात आणखी महत्त्वाचे निर्णय होणार असल्याचेही सांगितले. तसेच देशाच्या समोर एक संधी आहे. काँग्रेस सरकारचं पाच-सहा दशकांचं काम आणि माझं फक्त 10 वर्षांचं आहे. कोणत्याही क्षेत्रांबद्दल दोन्ही सरकारमधील कामाची तुलना करा, असे आवाहनही मोदींनी या वेळी मतदारांना केले. काही कमी असेल तरी आमच्या प्रयत्नांमध्ये काहीच कमी राहणार नाही अशी ग्वाहीदेखील त्यांनी आपल्या मुलाखतीत दिली. (PM Modi Interview With ANI)

विकासासाठी तंदुरस्त स्पर्धा असायला हवी. मी मुख्यमंत्री असल्यापासून माझा एक मंत्र आहे, तो म्हणजे मला गुजरातचा विकास करायचा आहे. कारण गुजरातचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, असे माझे मत होते, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत केले आहे. यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Narendra Modi
Prithviraj Chavan : पवारांकडून पृथ्वीराज चव्हाणांना दोनदा हुलकावणी; सातारा लोकसभा जागेबाबत काय घडलं?

पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीत महत्त्वाचे मुद्दे :

*पंतप्रधान म्हणून नाही तर रामभक्त म्हणून अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी

* व्होट बँक ही त्यांची अपरिहार्यता, म्हणून त्यांनी राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण धुडकावलं

* काँग्रेसच्या 50 वर्षांतील कामापेक्षा माझी 10 वर्षांतील कामगिरी सरस

* राम मंदिर हे सरकारी पैशातून नाही तर लोकवर्गणीतून निर्माण झालं आहे.

* पुढील 25 वर्षांसाठी माझं व्हिजन तयार आहे.

* निवडणुकांना सामोरे जाण्याआधीच १०० दिवसांचा प्लॅन

* 5 ते 6 दशके मिळूनही काँग्रेस देशातील गरिबी हटवू शकले नाहीत.

* भारताच्या विकासासाठी गुजरातचा विकास

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

* काँग्रेस कधीही आश्वासनं पूर्ण करत नाही.

* ईडीच्या केसेस केवळ 3 टक्के राजकीय व्यक्तींवर, 97 टक्के अराजकीय व्यक्तींवर;याचाच अर्थ ईडी चांगलं काम करत आहे.

* कोणत्या पक्षाला किती पैसा मिळाला, हे इलेक्टोरल बाॅण्डमुळे कळालं.

* विरोधकांची धोरणं युवा वर्गाची भविष्य चिरडणारी...

* देशाच्या भक्कमतेसाठी काम करतोय.

* देशातील विविधता हीच आमची शक्ती

(Edited By Deepak Kulkarni)

R

Narendra Modi
Suresh Mhatre Vs Kapil Patil : 'स्वार्थासाठी ते भिवंडी लोकसभा मतदारसंघाला खाईत लोटतील'; सुरेश म्हात्रेंचा कपिल पाटलांवर निशाणा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com