Rohit Pawar News : "भाजप उमेदवारीसाठी रोहित पवार फडणवीसांकडे विनवण्या करत होते"

Ajit Pawar Vs Rohit Pawar : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटातील नेते विरुद्ध रोहित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
devendra fadnavis rohit pawar
devendra fadnavis rohit pawarsarkarnama

लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात तू-तू-मैं-मैं रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी खासदार सुनील तटकरे ( Sunil Tatkare ) यांना लक्ष्य केलं होतं. "भाजपत उडी मारायची वेळ आल्यावर सुनील तटकरे पहिल्यांदा जातील," असा दावा रोहित पवारांनी केला होता. या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर आता सुनील तटकरेंनी बालबुद्धी म्हणत रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

"सुनील तटकरेंनी जयंत पाटील ( शेकाप ), शरद पवार आणि विचारांनासुद्धा सोडलं आहे. तटकरे आज अजित पवारांबरोबर दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"रोहित पवार बालबुद्धी आणि राजकारणान नवखे"

यावर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना तटकरे ( Sunil Tatkare ) म्हणाले, "2019 मध्ये हडपसर मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्याकडे वडिलांना घेऊन रोहित पवार विनवण्या करत होते. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवारांनी मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं कर्जत-जामखेडच्या आमदारकीचा राजीनामा देत रोहित पवार वडिलांना घेऊन कोणाला कितीवेळ भेटत होते, हे मला माहिती आहे. त्यामुळे बालबुद्धीच्या आणि राजकारणात अगदी नवख्या असलेल्या व्यक्तीवर फारसं बोलायचं नाही."

"भाजप अन् शिवसेनेचं पाठबळ अजितदादांच्या पाठीमागे"

"बारामतीत पवार विरुद्ध सुळे, अशी निवडणूक मानली जात आहे. बारामती मतदारसंघात अनेक वर्षे अजितदादांनी काम केलं आहे. भाजप आणि शिवसेनेचं पाठबळ अजितदादांच्या पाठीमागे उभं राहिलं आहे. अजितदादांचे अथक कष्ट, विकासाला दिलेली चालना आणि मित्रपक्षांच्या सहकार्यामुळे बारामतीच्या निवडणुकीत नक्की यश मिळेल," असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला.

"उदयनराजे ताकदवान नेते"

छत्रपती उदयनराजे भोसले साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. याबद्दल विचारल्यावर सुनील तटकरे म्हणाले, "उदयनराजे हे ताकदवान नेते आहेत. लोकसभेत त्यांनी सातारा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. काही दिवसांत अंतिम निर्णय होईल."

"नाशिकच्या जागेबद्दल केंद्रीय नेतृत्वाबाबत चर्चा"

महायुतीत नाशिकच्या जागेबाबत रस्सीखेच सुरू आहे. याबाबत प्रश्न विचारल्यावर तटकरेंनी म्हटलं, "रस्सीखेच फक्त महायुतीत नाही. काँग्रेस-शिवसेना ठाकरे गटात मैत्रीपूर्ण लढती आपण पाहत आहोत. नाशिकच्या जागेबद्दल केंद्रीय नेतृत्वाबाबत चर्चा झाली आहे. शेवटच्या टप्प्यात ही चर्चा आहे."

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com