Modi and Raj Thackeray : पंतप्रधान मोदी म्हणतात 'प्या'; राज ठाकरे म्हणतात 'पाजा'

Water Importance: लोकसभा निवडणुकीत एकमेकांना 'पाण्यात पाहणारे' नेत्यांमध्ये एकवाक्यता निर्माण होताना दिसत आहे. वाढत्या उन्हाबरोबर पाण्याचे महत्त्व या निमित्त अधोरेखित झाले.
Narendra Modi and Raj Thackeray
Narendra Modi and Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत वाढत्या उन्हामुळे पाण्याचे महत्त्व नेत्यांना जाणवत आहे. पण, लोकसभा मतदारसंघात विशेषतः ग्रामीण भागात अनेक मैल चालल्यावर पाणी आणणाऱ्या माता भगिनींचा त्रास मात्र या नेत्यांना दिसत नाही. पण, आता लोकसभा निवडणूक आणि प्रचारात 'तोंडचे पाणी पळल्यावर' कार्यकर्त्यांना पाण्याचे महत्त्व सांगणारे नेते समोर आले आहेत. काही राजकीय नेत्यांनी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला, तर काहींनी इतरांना पाणी पाजण्याचे पुण्यकर्म करण्याचा विचार मांडला आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्याच बरोबर उन्हाचे चटके आता असह्य झाले आहेत. विदर्भात तर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहाेचला आहे. त्याच बरोबर पारादेखील वाढला आहे. अशा वेळी पाण्याचे महत्त्व समोर आले आहे. नेत्यांना 'पाणी पाजणारे' अनेकजण आहेत. त्याच बरोबर राजकीय पक्षात एकमेकांना 'पाण्यात पाहणारे' देखील अनेक आहेत. अशा वेळी पाण्याचे महत्त्व सांगणारे दोन विधान 24 तासांत समोर आले. पंतप्रधान मोदी यांनी काल दिलेल्या एका मुलाखतीत स्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांच्या बरोबर विरोधातील कार्यकर्त्यांनादेखील उन्हाळ्यात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला. मुलाखत घेणाऱ्या संपादक महिलेने मोदींना हिवाळ्यात 'एक देश एक इलेक्शन' अंतर्गत भविष्यातील निवडणूक हिवाळ्यात घेण्याची गरज अधोरेखित केली. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi and Raj Thackeray
Solapur Lok Sabha 2024: 'सिद्धेश्वर'ची चिमणी, मोहिते पाटील, निष्क्रीय खासदार, पुन्हा मोदी! सोलापुरात स्वागत आहे..!

लोकसभा निवडणुकीत कोण कोणाला 'पाणी पाजते' हे पाहण्यासारखे असताना पाण्याचे महत्त्व दोन राजकीय नेत्यांनी अधोरेखित केले आहे. केवळ लोकसभा निवडणूक आहे म्हणून राजकीय नेते एकमेकांना 'पाण्यात पाहत' नाहीत, तर ते निरंतर विरोधकांबरोबर स्वकियांना कायम 'पाण्यात पाहत' असतात. 'रक्ताचे पाणी करत' अनेक कार्यकर्ते पक्षासाठी झटत असतात त्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला काल मुलाखतीत दिला.

लोकसभा निवडणुकीत 'खडकातून पाणी काढण्याचा' प्रयत्न उमदेवारांना करावा लागतो. अन्यथा, मतदार अशा उमेदवारांना 'पाणी पाजल्याशिवाय' राहत नाहीत. वारंवार निवडणुकीत उभे राहत 'तोंडाला पाणी सुटण्यापर्यंत' लढणारे अनेक दिग्गज नेते आहेत. त्यांना यंदा लोकसभा निवडणुकीत विरोधकांपैकी 'कोण पाणी पाजतो' हे पाहण्यासारखे असेल. इतकेच नाही तर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या 'तोंडचे पाणी पळविण्याची' याची दक्षता सूज्ञ मतदार घेताना दिसत आहे.

नेमके काय म्हणाले राज ठाकरे

गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास 40 अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाही. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही ? असा प्रश्न राज ठाकरे यांना पडला. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी. तसंच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल. महाराष्ट्र सैनिकांनी उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्यावी. तसंच या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत ) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल याची तजवीज करा. आणि प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅलरीत, गच्चीत पाणी ठेवा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

R

Narendra Modi and Raj Thackeray
Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा जागावाटपाचा वाद भाजप आमदारांसाठी ठरणार नवी डोकेदुखी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com