Eknath Shinde : भाजपचे महाराष्ट्रातील '45 प्लस'चे स्वप्न भंगणार, मग शिंदेंचे मुख्यमंत्रीपद शाबूत राहणार?

Sharad Pawar Vs Ajit Pawar : पुणे जिल्ह्यात मोठ्या पवारांचीच आघाडी, अजित पवारांना शिरुरचे आव्हान पेलवणार नाही?
Eknath shinde | devendra fadnavis
Eknath shinde | devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Exit Polls Result 2024 : देशातील मतदानाचे सर्व टप्पे शनिवारी (ता.१) संपले. त्यानंतर विविध एक्झिट पोलचे अंदाज लगेच सायंकाळी आले. त्यानुसार भाजपचे महाराष्ट्रातील 45 प्लसचे स्वप्न भंगणार आहे.

कारण विविध एक्झिट पोलमध्ये ( Exit Polls Result 2024 ) त्यांना 22 ते 34 जागा मिळतील, असे सांगितले आहे. तसं झाले, तर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी पुन्हा घडण्याची शक्यता आहे.

केंद्रात सत्तेची हॅटट्रिक करण्याची भाजपची मदार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशावर आहे. काही एक्झिट पोलचा अंदाज खरा मानला, तर महाराष्ट्र मात्र, त्यात कमी पडताना दिसत आहे.

महाराष्ट्रात भाजपने ( Bjp ) '45 प्लस'चा नारा दिला होता. तो 'टीव्ही 9 पोलस्ट्राट'च्या एक्झिट पोलमध्ये खोटा ठरतो आहे. त्यांच्या अंदाजानुसार फक्त 22 जागा त्यांना मिळत आहे. तर, 'सी व्होटर' आणि 'एबीपी माझा'च्या या पोलमध्ये त्यांना 24 जागा मिळणार आहेत. तर, 'रिपब्लिक'ने 32, तर 'इंडिया न्यूज'ने 34 जागा महायुतीला दिल्या आहेत. तरीही त्यांचे '45 प्लस'चे स्वप्न साकार होताना दिसत नाही.

महाराष्ट्रातील 48 पैकी 28 जागा भाजपने,15 जागा शिंदे शिवसेनेने, तर पाच जागा अजित पवार राष्ट्रवादीने लढविलेल्या आहेत. एक्झिट पोलनुसार भाजपचा परफॉर्मन्स हा मित्रपक्षांपेक्षा सरस दिसतो आहे. तरी तो मोदी-शाहांच्या अपेक्षेनुसार म्हणजे '45 प्लस'पेक्षा खूप कमी आहे.

जर, हा अंदाज खरा ठरला, तर त्याचे बिल भाजपच्या राज्यातील कोणत्या नेत्यावर फाडले जाणार याची चर्चा लगेच सुरु झाली आहे. परदेश दौऱ्यावरून अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हे अपयश शेकले जाईल, अशी शक्यता आहे.

महायुतीतील शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स हा निराशाजनक असेल, असे 'टीव्ही ९' चा एक्झिट पोल सांगतो आहे. त्यानुसार भाजपला 18, शिंदे गटाला 4, तर अजित पवार राष्ट्रवादीला भोपळा मिळणार आहे. तसे झाले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ( Eknath Shinde ) मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे.

चार महिन्यानंतर राज्यात विधानसभेची निवडणूक होणार असून त्यात लोकसभेपेक्षा चांगला रिझल्ट यावा म्हणून भाजप राज्यातील सत्तेतच नाही, तर पक्ष संघटनेतही फेरबदल करेल, असा अंदाज आहे. शिंदे आणि अजित पवार ( Ajit Pawar ) यांचे वजन महायुतीत तथा भाजपमध्ये लोकसभा लोकसभा निकालानंतर घटू शकते.

Eknath shinde | devendra fadnavis
Sharad Pawar Vs Ajit Pawar : घड्याळाची टिकटिक बंद पाडण्यासाठी शरद पवारांनी तेल ओतलेली मशाल पेटणार?

पुणे जिल्ह्यातील चारपैकी दोन जागा महायुतीला मिळतील, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. मात्र,अजित पवार यांनी आपल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या शिरुर आणि बारामतीमध्ये त्यांचा पराभव होईल, असे काही एक्झिट पोल सांगत आहेत. तसं झालं, तर ती अजितदादांची नाचक्की होणार आहे. कारण, बारामतीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा या उमेदवार आहेत. तर शिरुरमध्ये त्यांनी शिंदे शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना आयात करून आपल्या पक्षाची उमेदवारी दिली.

तसेच तेथील आघाडीचे (शरद पवार राष्ट्रवादी) उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचे चॅलेंज त्यांनी दिले होते. मात्र, ते एक्झिट पोलमध्ये खोटे ठरत आहेत. कारण कोल्हे तेथे विजयी होत आहेत. ते शरद पवारांचे उमेदवार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या बालेकिल्यात (पुणे जिल्हा) शरद पवार यांचीच जादू कायम राहणार असे एक्झिट पोल सांगत आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Eknath shinde | devendra fadnavis
Exit Poll 2024 : बुरुज ढासळूनही शरद पवारांच्या बालेकिल्ल्याची तटबंदी मजबूत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com