Sharad Pawar Vs Ajit Pawar : घड्याळाची टिकटिक बंद पाडण्यासाठी शरद पवारांनी तेल ओतलेली मशाल पेटणार?

Dharshiv Lok Sabha Politics : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आघाडीवर असल्याचा अंदाज टीव्ही 9 पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
Sharad Pawar, Uddhav Thackeray, Ajit Pawar
Sharad Pawar, Uddhav Thackeray, Ajit PawarSarkarnama

Lok Sabha Election 2024 : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघाच महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चनाताई पाटील या कट्टर राजकीय विरोधक असलेल्या दीर-भावजयीत लढत झाली. या लढतीत राजेनिंबाळकर बाजी मारणार, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. हा अंदाज चार जून रोजी खरा ठरला तर तो जिल्ह्यात प्रचंड शक्तिशाली असलेल्या महायुतीसाठी मोठा धक्का ठरणार आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. अर्चनाताई पाटील यांचे पती राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापूरचे भाजपचे आमदार आहेत. अर्चनाताई पाटील यांनी एेनवेळी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली. महाविकास आघाडीत स्पर्धाच नसल्याने आणि राजेनिंबाळकर हे विद्यामान खासदार असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळणार, हे निश्चित होते. त्यामुळे उमेदवारी जाहीर व्हायच्या आधी काही महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघात फिरून लोकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरवात केली होती.

टीव्ही 9 पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलमध्ये राजेनिंबाळकर विजयी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या मतदारसंघात महायुतीची शक्ती प्रचंड एकवटली होती. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि चार आमदार, माजीमंत्री बसवराज पाटील, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी झोकून देऊन अर्चनाताई पाटील यांचा प्रचार केला होता.

राजेनिंबाळकर यांची यंत्रणा महायुतीसमोर तोकडी होती. राणाजगजितसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्यात भाजप आधीच मजबूत आहे. त्यात काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांनी प्रवेश केल्यामुळे भाजप आणखी मजबूत दिसू लागला आणि काँग्रेस पक्ष अत्यंत कमकुवत झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. सुरेश बिराजदार हे अजितदादा यांच्यासोबत गेले. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आणि काँग्रेसमध्येही जिल्हाभरात व्याप्ती असलेले नेते शिल्लक राहिले नाहीत.

Sharad Pawar, Uddhav Thackeray, Ajit Pawar
Shirur Exit Poll: अमोल कोल्हे अजितदादांचं आव्हान मोडीत काढणार; आढळरावांची शिकार करणार ?

अशा परिस्थितीत राजेनिंबाळकर एकहाती किल्ला लढवत असल्याचे दिसले. कैलास पाटील हे धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे एकमेव आमदार त्यांच्यासोबत होते. आपली यंत्रणा तोकडी पडणार आणि विरोधक प्रचंड शक्तिशाली आहेत, याकडे राजेनिंबाळकर यांनी दुर्लक्ष केले नाही. गेल्या पाच वर्षांत ते सातत्याने लोकांच्या संपर्कात राहिले. दररोज किमान आठशे लोकांचे फोन त्यांना यायचे, फोन नाही उचलला तर मी त्यांना कॉलबॅक करायचो, असे राजेनिंबाळकर यांनी प्रचारात ठिकठिकाणी सांगितले. तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे, हे प्रचारादरम्यान दिसून आले होते.

Sharad Pawar, Uddhav Thackeray, Ajit Pawar
North West Mumbai Exit Poll : अमोल कीर्तीकर ठाकरेंची शान राखणार; उत्तर पश्चिम मुंबईत मुख्यमंत्री शिंदेंना धक्का

खासदार आपण केलेला फोन उचलतात, याचे सामान्य माणसाला कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे राजेनिंबाळकर यांनी प्रचारात याच मुद्द्यावर भर दिला. या मशालीत शरद पवार तेल टाकताहेत आणि राहुल गांधी वात टाकत आहे, पण ती पेटणार नाही, अशी टीका माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी प्रचारादरम्यान केली होती. आता एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला तर शरद पवार यांनी तेल ओतलेली मशाल पेटणार आहे.

एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला तर महायुतीत एकवटलेली शक्ती लोकांना आवडली नाही, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. पण हा फक्त अंदाज आहे. खरा निकाल चार जून रोजी लागणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांना उस्मानाबाद मतदारसंघातही सहानुभूती होती. सर्व दिग्गज महायुतीत एकवटलेले असताना राजेनिंबाळकर हे आमदार कैलास पाटील यांच्यासह राहुल मोटे, ज्ञानेश्वर पाटील, दयानंद गायकवाड या माजी आमदारांना सोबत घेऊन किल्ला लढवत असल्याचे लोकांनी पाहिले. त्यामुळे राजेनिंबाळकर यांच्या सहानुभूतीत भर पडली असावी.

राजेनिंबाळकर यांचा मतदारसंघातील नागरिकांशी असलेला संपर्क, नागरिकांच्या सुखदुखाःत त्यांचे सहभागी होणे, या बाबी शक्तिशाली महायुतीला जड गेल्या, असे म्हणावे लागेल. अर्थात, एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला तर. निकाल दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. निकालाच्या दिवशीच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com