Balwant Wankhade : एकनाथ शिंदे, अजित पवारांचे मोठे बलिदान..! बळवंत वानखडेंचे लोकसभेतून बाण, भाषणावर अध्यक्षांचा आक्षेप

Lok Sabha Session Union Budget : बळवंत वानखडे यांनी अर्थसंकल्पावरील भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींविषयीही वादग्रस्त विधान केले आहे.  
Eknath Shinde, Ajit Pawar, Balwant Wankhade
Eknath Shinde, Ajit Pawar, Balwant WankhadeSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी शुक्रवारी लोकसभेत पहिले भाषण केले. पहिल्याच भाषणात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत सरकारला टोला लगावला.

अर्थसंकल्पावर बोलताना महाराष्ट्राला भोपळा मिळाल्याचे वानखडे यांनी सांगितले. त्याआधी त्यांनी शिंदे व अजितदादांनाही टोला लगावला. अर्थसंकल्प हा काही राज्यांपुरते की देशाचा आहे हा प्रश्न संपूर्ण सभागृहाला पडला आहे, असे सरकारला सुनावले.

Eknath Shinde, Ajit Pawar, Balwant Wankhade
Nitish Kumar : विधिमंडळात मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणं भोवलं; आमदारकी रद्द...

खुर्ची वाचवण्याच्या नादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचे सरकार आणण्यासाठी फार मोठे बलिदान दिले. पण त्या बलिदानाचा कुठलाही विचार अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही. जीएसटीचे सर्वाधिक उत्पन्न देऊनही महाराष्ट्राला भोपळा मिळाला, अशी टीका वानखडे यांनी केली.

पंतप्रधान मोदींविषयी वादग्रस्त विधान

वानखडे यांनी अर्थसंकल्पावर बोलताना संविधान हत्या दिनाला विरोध केला. केंद्र सरकारने आणाबाणी लावण्यात आल्याचा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यावर बोलताना वानखडे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

Eknath Shinde, Ajit Pawar, Balwant Wankhade
Yogi Adityanath : दोन उपमुख्यमंत्र्यांचे थेट मुख्यमंत्र्यांना खुलं चॅलेंज; भाजपची डोकेदुखी वाढली...

काय म्हणाले बळवंत वानखडे?

संविधान हत्या दिवस ही संकल्पना असंविधानिक आहे. हा नकारात्मक विचार आहे. तुम्ही त्याचा उत्सव साजरा करत आहात. संविधान अमर आहे, संविधान अमर राहील. पंतप्रधान सातत्याने संविधानावर डोकं टेकवतात. पण त्यांच्याच हातून सतत संविधानाचा खून होत आहे, अशी टीका वानखडे यांनी केली. संविधान हत्या दिवस साजरा करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही वानखडे यांनी केली.

पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी वानखडे यांच्या विधानावर आक्षेप घेतला. पंतप्रधानांच्या हातून संविधानाचा खून होतो, हे शब्द मागे घ्या. ते कामकाजातून हटवण्यात यावे, अशी सूचना त्यांना केली. त्यानंतर वानखडे यांनी दोन मिनिटांत आपले भाषण संपवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com