Mahayuti Seat Allocation : महायुतीचं जागावाटप 4 ते 5 जागांवर अडलंय; देवेंद्र फडणवीसांची कबुली

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते अमित देशमुख आमच्या संपर्कात नाहीत. त्यांच्या भाजप प्रवेशाची कोणतीही चर्चा नाही. विरोधी पक्षातील नेते असले तरी त्यांना विनाकारण संशयाच्या फेऱ्यात अडकविणे योग्य नाही.
Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama

Mumbai, 30 March : महायुतीचं जागावाटप 4 ते 5 जागांवर अडलंय. एक जागा अडली की तीन जागा अडतात. एक जागा ह्यांची असेल तर ती त्यांची असते. पण, फार काही अडलंय अशी परिस्थिती नाही. एक ते दोन दिवसांत जागावाटपाचा तोही तिढा सुटेल, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केले.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसही आज किंवा उद्या काही जागांची घोषणा करेल. त्यामुळे महायुतीचे (Mahayuti) जागावाटप लवकरच जाहीर होईल, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Devendra Fadnavis News : ‘आम्ही ऑपरेशन केले, तर तुम्हाला कळतच नाही’; दानवेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर फडणवीसांची गुगली

अर्चना पाटील लोकसभेच्या उमेदवार आहेत की नाहीत, हे मला माहिती नाही. पण, भाजपमध्ये उमेदवारीचा निर्णय हा पार्लमेंटरी बोर्डाचा असतो. मात्र, आमची इच्छा २०१९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी होती. आता त्या भाजपमध्ये आल्या आहेत. योग्य नेतृत्वाचा उपयोग कसा करायचा, हे पक्षाला चांगलं माहिती असते, असं उत्तर फडणवीस यांनी अर्चना पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीबाबत दिले.

फडणवीस म्हणाले, काँग्रेस नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) आमच्या संपर्कात नाहीत. त्यांच्या भाजप प्रवेशाची कोणतीही चर्चा नाही. विरोधी पक्षातील नेते असले तरी त्यांना विनाकारण संशयाच्या फेऱ्यात अडकविणे योग्य नाही. आमदार रमेश कराड (Ramesh Karad) यांच्या अनुपस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. अर्चना पाटील (Archana Patil) यांना भाजपमध्ये घ्या, असा सर्वाधिक आग्रह आमदार कराड यांचाच होता. सगळे कार्यक्रमला पोहोचू शकतात, असे होत नाही. भारतीय जनता पक्षात वेगवेगळं मत देऊ शकतात. मात्र, निवडणुकीत सर्व एकत्र येऊन काम करतात, हे तुम्हाला लोकसभा निवडणुकीत दिसेल.

Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Udgir Congress News : उदगीर काँग्रेसचा हुकमी एक्का भाजपने टिपला; राजकीय समीकरणे बदलणार...

मनसेसोबत युतीचा अद्याप निर्णय नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आमच्या बैठका झाल्या आहेत. निवडणुकीसंदर्भात सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातात. पण मनसेसोबतच्या युतीचा कोणताही निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

आजी-माजी आमदार घेणार धाराशिव लोकसभेचा निर्णय

धाराशिव लोकसभा मतदारसंघाबाबत काय करायचं, हे आजी माजी आमदारच ठरवत आहेत. मी, अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलंय की तुम्ही जो निर्णय करून याल, त्यावर आम्ही शिक्कामोर्तब करू, त्यामुळे धाराशिवचा निर्णय स्थानिक नेतृत्वावर सोपविण्यात आल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

R

Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Mushrif-Ghatge Came Together : राजकीय वैर विसरून घाटगे-मुश्रीफ मंडलिकांसाठी आले एकत्र; बंद खोलीत अर्धा तास चर्चा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com