Mahadev Jankar News: परभणीतून महादेव जानकरांना महायुतीची उमेदवारी

Political News : रासपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणीची जागा देण्यात आली आहे. त्यामुळे महादेव जानकर याठिकाणाहून निवडणूक लढणार आहेत. रायगड व शिरूरमधील उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच केली आहे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Parbhni News : परभणीतून रासपचे महादेव जानकर यांना महायुतीचे अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. रासपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणीची जागा देण्यात आली आहे. त्यामुळे महादेव जानकर याठिकाणाहून निवडणूक लढणार आहेत. रायगड व शिरूरमधील उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच केली आहे. (Mahadev Jankar News)

Mahadev Jankar
Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : "करारा जवाब दूंगा," विखेंचा लंकेंना थेट इशारा

परभणीची जागा महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत महादेव जानकर यांच्या नावाची घोषणा त्यांनी केली. यावेळी रासपचे उमेदवार महादेव जानकर उपस्थित होते.

या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. त्यामुळे ही जागा कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच रायगडमधून सुनील तटकरे यांना तर शिरूरमधून शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी दिल्याची घोषणा केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीमध्ये सहा ते आठ जागांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने (Ncp) केली होती. त्यानुसार काही जागा मिळाल्या आहेत. त्यासोबतच काही जागांबाबत बोलणी सुरु आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी काही जागा मिळतील असा, आशावाद सुनील तटकरे (Sunil tatkare) यांनी व्यक्त केला.

Mahadev Jankar
Kolhapur NCP : 'बडा घर, पोकळ वासा!'; कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या स्थितीला जबाबदार कोण?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com