Loksabha Opinion Poll : भाजपचे 'मिशन 45' डेंजर झोनमध्ये? सर्व्हेतून महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

Political News : राज्यात महायुतीला फटका तर महाविकास आघाडीला फायदा
Loksabha Election Opinion Poll
Loksabha Election Opinion Poll Sarkarnama

Loksabha Election News: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर आता आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकासाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. यातच महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबाबत ओपिनियन पोल म्हणजेच जागांचा आढावा घेणारा एबीपी-सी व्होटरने केलेला सर्वे समोर आला आहे.

या सर्वेक्षणातील अंदाजानुसार भाजपचे 'मिशन 45' डेंजर झोनमध्ये असून महायुतीला धक्का बसत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीसाठी आशादायक चित्र असल्याचे सर्व्हेतून पुढे आले आहे.

Loksabha Election Opinion Poll
Nagar Political News : दिल्ली ते गल्ली आमचे सरकार ; राजळेंवर टीका करणाऱ्यांचा विखेंकडून समाचार..

शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेनेचीही अवस्था राज्यात काहीशी नाजूक असल्याचे दिसत असताना एबीपी-सी व्होटरच्या सर्वेमुळे आशादायक चित्र वाटत आहे.

या सर्वेनुसार 41 टक्के मते मिळाल्याने काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) यांच्या महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

दुसरीकडे भाजप, शिवसेना (शिंदे गट) व अजित पवार गटाला 37 टक्के मते मिळतील, असा अंदाज या सर्व्हेत सांगितला आहे. त्यानुसार महायुतीला महाराष्ट्रात 19 ते 21 जागा मिळण्याचा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना-भाजपला मिळाल्या होत्या 48 पैकी 41 जागा

2019 च्या लोकसभा निवडणुकीत (loksabha Election) शिवसेना-भाजपला 48 पैकी 41 जागा मिळाल्या होत्या. भाजपने (Bjp) 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ पाच जागावर समाधान मानावे लागेल होते. त्यापैकी राष्ट्रवादीला चार तर कॉंग्रेसला एक जागा मिळाली होती. तर एक जागा अपक्ष तर एक जागा एमआयएमने जिंकली होती.

(Edited by Sachin Waghmare)

Loksabha Election Opinion Poll
Loksabha Election : मविआचे ठरलं : लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटपाचे दोन फॉर्म्युले फायनल

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com