

Maharashtra Mahapalika Nivadnuk News: राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महापालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रमुख पक्षांच्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षानं दिलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीतीही आखली जाते आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.उमेदवारी अर्ज भरत सर्वच राजकीय पक्षात बंडखोरी झाली आहे. या बंडखोराचा फटका बसू नये म्हणून नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यांना सर्व पातळीवर समजविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
तिकीट न मिळालेल्या 'बंडोबांना' थंड करण्यासाठी राजकीय पक्षांनी 'साम-दाम-दंड-भेद' नीतीचा अवलंब सुरू केला आहे.अर्ज माघारीसाठी नेत्यांकडून प्रलोभनं दाखवली जात आहे. मनधरणी करताना दबावही आणला जात आहे. ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण, नवी मुंबईत बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत.
काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्याचे नवे फंडेही वापरले जाताना दिसतात. बंडखोरांनी माघार घ्यावी, यासाठी नेत्यांची धडपड सुरु आहे. मांडवली आणि पदांच्या आमिषांसह थेट कारवाईचा इशाराही दिला जात आहे. अर्ज माघारीनंतरच ख-या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे. कोणकोण उमेदवारी अर्ज माघारी घेतात याची उत्सुकता आहे.
निवडणुकीत एखाद्या पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतरही, तिकीट न मिळाल्याने किंवा अंतर्गत नाराजीमुळे काही नेते/कार्यकर्ते स्वतंत्र किंवा विरोधी उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतात, यालाच बंडखोरी म्हणतात.
बंडखोर उमेदवार सहसा माघार घेण्यास तयार नसण्यामागे काही ठळक कारणे :
पक्षातील अन्यायाची भावना
स्थानिक पातळीवरील गटबाजी
स्वतःची ताकद दाखवण्याची इच्छा
पुढील राजकीय वाटचालीसाठी दबाव निर्माण करणे
पक्ष नेतृत्वाविरुद्ध नाराजी
मतविभाजन (Vote Split) होते
अधिकृत उमेदवाराचे नुकसान होते
थेट विरोधी पक्षाला फायदा होतो
पक्षाची प्रतिमा डागाळते
म्हणूनच वरिष्ठ नेते, निरीक्षक, मंत्री किंवा खास दूत बंडखोरांची मनधरणी, समजूत काढणे, आश्वासने देणे यासाठी सक्रिय होतात.
नेते पुढील उपायांचा अवलंब करतात:
भविष्यातील पदाचे किंवा जबाबदारीचे आश्वासन
पक्षात महत्त्वाची भूमिका देण्याचे आश्वासन
स्थानिक प्रश्न सोडवण्याचे वचन
काही वेळा शिस्तभंगाची कारवाईचा इशारा
संबंधित उमेदवारावर पक्षातून निलंबन/हकालपट्टी
पुढील काही वर्षे पक्षात संधी मिळणे कठीण
स्थानिक राजकारणात कायमस्वरूपी दुरावा
तरीही काही बंडखोर “बंडखोरीतून राजकीय ओळख” निर्माण करण्यात यशस्वी ठरतात.
स्थानिक समीकरणे जास्त प्रभावी असतात
वैयक्तिक मतदारसंघ महत्त्वाचा ठरतो
त्यामुळे बंडखोरीचे प्रमाण जास्त दिसते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.