Angar Nagar Panchayat News: अनगर नगरपंचायतीच्या नवनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्ता पाटलांच्या शपथपत्रात चुका? उज्ज्वला थिटेंचे न्यायालयात आव्हान

Angar Nagarpanchayat twist Prajkta Patil affidavit mistake News:प्राजक्ता पाटील यांनी शपथ पत्रात अनेक त्रुटी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. उज्जला थिटे यांनी याबाबत कोर्टात याचिका दाखल केली आहे. अनगर नगरपंचायत निवडणुक रद्द करण्याची मागणी उज्ज्वला थिटे यांनी केली आहे.
Ujwala Thite
Ujwala ThiteSarkarnama
Published on
Updated on

Angar Nagar Panchayat News: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत गेल्या महिन्यात मोठं राजकीय नाट्य झाल्याचे आपण पाहिले. आता पुन्हा ही नगरपंचायत चर्चेत आली आहे.

अनगरच्या नवनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांनी निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या शपथ पत्रात अनेक त्रुटी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. उज्जला थिटे यांनी याबाबत कोर्टात याचिका दाखल केली आहे. अनगर नगरपंचायत निवडणुक रद्द करण्याची मागणी उज्ज्वला थिटे यांनी केली आहे.

निवडणुक अर्ज दाखल करण्याच्या वेळी प्राजक्ता पाटील यांनी त्यांच्या पतीच्या मालमत्तेची अपूर्ण माहिती दिली आहे. त्यांच्या शेअरची माहिती दिलेली नाही. त्यांची इतर काही गुंतवणुक आहे, त्यांची माहिती दिलेली नाही. हजारो कोटींची त्यांची संपत्ती आहे. पण त्यांनी झिरो दाखवली आहे. त्यांचे पतीचे नावही त्यांनी टाकले नाही. त्यांनी निवडणुक आयोगाची फसवणूक केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अनगर ही ग्रामपंचायत होती. अनगरला यंदाच्या वर्षी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. एकूण १७ सदस्य संख्या असलेल्या या नगरपंचायती ही भाजपच्या ताब्यात आली आहे. नगराध्यक्षपदी प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्राजक्ता पाटील या मोहोळ माजी आमदार राजन पाटील यांच्या स्नुषा आहेत.

प्राजक्ता पाटील यांच्याविरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्ज्वला थिटे पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. माजी आमदार राजन पाटील यांच्यासोबत एका किरकोळ कारणावरून उज्ज्वला थिटे यांचा वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यामुळे उज्ज्वला थिटे पाटील यांनी गाव सोडले होते. नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर थिट पुन्हा सक्रीय झाल्या. वाहतूक कोंडी करण्यात आल्यामुळे त्यांना निवडणूक अधिकारी कार्यालयात जाण्यास अडथळा झाला होता. त्यांनी पोलिस बंदोबस्तांची मागणी केली होती पण त्यांना पोलिस बंदोबस्त देण्यात आला नाही.

Ujwala Thite
Nandini Chakraborty: कोण आहेत IAS नंदिनी चक्रवर्ती? पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव; ममतादीदींसोबत काय आहे नातं?

पन्नास वर्षांपासून बिनविरोध होत असलेल्या अनगरची ही निवडणुकही बिनविरोध व्हावी, अशी राजन पाटील यांची इच्छा होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून थिटे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. पण अर्ज छानणीत त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. दुसऱ्या एका अपक्ष उमेदवारांने आपला अर्ज माघारी घेतल्याने प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. आता त्यांच्या निवडीला थिटे यांनी कोर्टोत आव्हान दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com