Mohan Bhagwat News: 'नोटा' बाबत आरआरएस प्रमुखांचे महत्वाचे विधान! मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क

RSS Chief Mohan Bhagwat Casts Vote Important Statement: लोकशाहीच्या रचनेमध्ये मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व असून ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपल्याला जो योग्य वाटतो त्या उमेदवाराला मत देणे महत्त्वाचे असून मतदानाच्या दिवशी मतदान करणे हेच प्रत्येक नागरिकाचे पहिले कर्तव्य आहे.
RSS Chief Mohan Bhagwat
RSS Chief Mohan BhagwatSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Mahapalika Election 2026 Updates: महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरवात झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक सघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. मोहन भागवत यांनी नागपूर महापालिका निवडणुकीत मतदान करतांना महत्वाचे विधान केले आहे.

नोटाला का मतदान करू नये, असे सांगत "नोटा म्हणजे, आपण सर्वांना रिजेक्ट करतो, तेव्हा आपण नको असलेल्या माणसाला प्रमोट करतो असे होते. यामुळे नोटा नागरिकांच्या वैतागाच्या दृष्टीने दिेलेला ऑप्शन असला तरी, त्यातल्या त्यात चांगला माणून. अराजक, राजा नसणे हे सर्वात वाईट,' असे पितामह भिष्मांनी म्हटले आहे. त्यामुळे कुणीच नाही, त्यापेक्षा कुणीतरी हवा. देश चालण्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे." असे मोहन भागवत म्हणाले.

लोकशाहीच्या रचनेमध्ये मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व असून ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपल्याला जो योग्य वाटतो त्या उमेदवाराला मत देणे महत्त्वाचे असून मतदानाच्या दिवशी मतदान करणे हेच प्रत्येक नागरिकाचे पहिले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. "लोकांनी मतदानासाठी बाहेर पडायला हवे. हे तुम्हीही सांगत असता, निवडणूक आयोगही सांगत असतो आणि आम्हीही सांगत असतो. आता परिणाम जेव्हा होईल तेव्हा होईल," असे ते म्हणाले.

RSS Chief Mohan Bhagwat
Mahapalika Nivadnuk 2025: मतदानाला काही तास शिल्लक असतानाच संभाजीनगरमध्ये राडा; आठ जण जखमी, व्हिडिओ पाहा

लोकशाहीच्या रचनेमध्ये मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व असून ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपल्याला जो योग्य वाटतो त्या उमेदवाराला मत देणे महत्त्वाचे असून मतदानाच्या दिवशी मतदान करणे हेच प्रत्येक नागरिकाचे पहिले कर्तव्य आहे. याच भावनेतून आपण स्वतः पहाटे मतदानासाठी उपस्थित राहिलो आहे, असेही मोहन भागवत म्हणाले.

काय म्हणाले मोहन भागवत

  • मतदान करताना केवळ वैयक्तिक पसंती नव्हे, तर जनहिताचा विचार केंद्रस्थानी ठेवला पाहिजे

  • मतदानाबाबत निवडणूक आयोग सातत्याने जनजागृती करत असतो.

  • समाजातील जबाबदार घटकही नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करत असतात.

  • याचा सकारात्मक परिणाम होण्यास काही काळ लागू शकतो, मात्र तो नक्कीच होईल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com