Mahapalika Nivadnuk 2025: मतदानाला काही तास शिल्लक असतानाच संभाजीनगरमध्ये राडा; आठ जण जखमी, व्हिडिओ पाहा

Chhatrapati sambhajinagar Mahapalika Nivadnuk 2025: मतदानाच्या पूर्वसंध्येलाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला. दोन गटात तुफान हाणामारी झाली. हाणामारीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Chhatrapati Sambhajinagar Municipal
Chhatrapati Sambhajinagar MunicipalSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असताना नारेगावामध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन उमेदवारांचे समर्थक आमने-सामने आल्याने तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मतदानाच्या पूर्वसंध्येलाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला. दोन गटात तुफान हाणामारी झाली. हाणामारीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नारेगावमध्ये पैसे वाटपाच्या वादातून दोन गटांत तुफान राडा झाला.

या हाणामारीत आठ जण जखमी झाले आहेत. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर काही काळ नारेगावची संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal
PMC Nivadnuk: पुण्यात निवडणुकीत पैशांचा पाऊस! आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च

छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी आज (ता.15) मतदान होत आहे. छत्रपती संभाजीनगर नव्या याद्यांनुसार 11 लाख 18 हजार 263 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काही प्रभागातील मते कमी करण्यात आली आहेत तर काही प्रभागातील मते वाढली आहेत. सर्वाधिक 50 हजार 103 प्रभाग पाचमध्ये आहेत तर सर्वाधिक कमी 32 हजार 522 मतदार प्रभाग 26 मध्ये आहेत.

पुणे मुंबई, नाशिकसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. उद्या (शुक्रवारी) सकाळपासून मतमोजणी सुरु होणार आहे. या निवडणुकीत २ हजार ८६९ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. महापालिकेसाठी कुठे भाजप-शिंदेसेना तर कुठे भाजप-राष्ट्रवादी यांच्यामध्ये युती आहे. तर ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत.

आज 'अ‍ॅक्वा लाईन'; मेट्रो धावणार मध्यरात्रीपर्यंत

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) मतदान प्रक्रियेत गुंतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मुंबई मेट्रोच्या 'अ‍ॅक्वा लाईन'ने (मेट्रो-3) कंबर कसली असून, गुरुवारी विशेष अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेत केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी मेट्रोची सेवा पहाटे 5.00 वाजल्यापासूनच सुरू झाली आहे. रात्री उशिरापर्यंत कामावरून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सामान्य दिवसांच्या तुलनेत मतदानाच्या दिवशी या विशेष फेऱ्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com