Maharashtra Live Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama

Ajit Pawar : आपापला पक्ष वाढवण्यात काहीही गैर नाही - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी महायुतीतले सर्वच आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असू त्यामध्ये काहीही गैर नाही असं म्हटलं आहे. शिवाय विरोधक देखील आपापल्या परीने पक्ष वाढवतात. त्यामुळेच मी आज सांगलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. तर 25 तारखेला कोल्हापूर जिल्ह्यातील देखील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Mumbai Rain : मुंबईत पावसामुळे प्रवाशांचे हाल, मोठी वाहतूक कोंडी

मुंबईसह रायगडमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे आज सकाळपासून मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या सरासरी अर्धा ते एक तास उशिराने धावत आहेत. तर अनेक ठिकाणी पाणी रुळावर साचल्याने प्रवाशांना स्थानकांवर तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. शिवाय शहरातील रस्त्यांनाही नद्यांचे स्वरूप आल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Rain Alert : मुंबईसह रायगडला पावसाचा रेड अलर्ट

मुंबईसह रायगडमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज शनिवारी (ता.16) मुंबई, ठाणे, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या कोकण किनारपट्टीच्या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Mumbai Rain Landslide : मुंबईत मुसळधार पाऊसामुळे दरड कोसळली, दोघांचा मृत्यू

मुंबईत आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असून रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पूर्व उपनगरातील विक्रोळी परिसरात आज पहाटे दरड कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसेंच्या जावयाच्या अडचणी वाढल्या, सायबर पोलिसांत महिलेकडून तक्रार दाखल

खराडी पार्टी प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने 2022 ते जून 2025 या काळात खेवलकरने वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून त्यांचे निर्वस्त्र फोटो संमती नसताना काढल्याचा आणि या फोटोंचा गैरवापर केला जाण्याची शक्यता आहे, अशी फिर्याद महिलेने सायबर पोलिसांत दिली होती त्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com