राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या गट व गणनिहाय अंतिम मतदार याद्या व मतदान केंद्रांची यादी 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. दिवाळीनंतर याद्या अंतिम होणार असून निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याचे राऊत म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी सात वाजताच सोलापुरात पोहचले, ते धाराशीव येथे रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही धाराशीवच्या दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे या जालना जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर आणि लातुरच्या दौऱ्यावर आहेत.
सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सोलापूर - कोल्हापूर महामार्गवरील तिऱ्हे पूल गेला पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सोलापूर - कोल्हापूर वाहतूक झाली ठप्प आहे. तिऱ्हे परिसरातील पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे विश्वासू समजेल जाणारे पवन कंवर यांच्या सावरगावजवळ हल्ला करण्यात आला. कंवर यांच्यासह त्यांच्यासोबत असेलल्या तीन जणांवर देखील हल्ला गेला गेला. बीडमधील सावरगावजवळ जेवण करत असतानाच 40 ते 50 अज्ञातांनी पवन कंवर यांच्यावर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले.
अजित पवारांनी सोलापूरच्या पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा करमाळा तालुक्यातील कोर्टी इथून सुरू केला. सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवावी, असे स्पष्ट निर्देश अजित पवार यांनी दिले.
शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रति शिर्डी शिरगावचे मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज (ता. 24 सप्टेंबर) रोजी दुपारी 3.00 वा. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. पावसामुळे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रात्री 11 पासून थांबण्यात आली आहे. सीन नदीच्या प्रवाहात वाढ झाल्यानंतर महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. महामार्ग बंद केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.