Maharashtra Updates : देश-विदेशात दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama
Published on
Updated on

जरांगे यांना शेवटचा अल्टिमेटम, आमदार फुके यांनी दिला इशारा

नागपूर : मनोज जरांगे यांनी पुन्हा मराठा आरक्षणाचे हत्यार उपसले आहे. यावेळी ते जरा जास्तच आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबीयांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने भाजपचे नेते चांगलेच चिडले आहेत. त्यामुळे आमदार व ओबीसी नेते परिणय फुके यांनी आपल्या बाह्या पुन्हा खोचल्या असून जरांगे आपली जीभ आवरावी असा सल्ला देऊन त्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. हे बघता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण हाच मुद्दा तापणार असून आरोप-प्रत्यारोपाची धार आणखी वाढणार असल्याचे दिसून येते.

लेफ्ट. जनरल राजा सुब्रमणि (निवृत्त) यांची NSCS चे  सल्लागार म्हणून नियुक्ती

भारतीय लष्कराचे माजी उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राजा सुब्रमणि (निवृत्त) यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) चे नवीन लष्करी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते १ सप्टेंबर रोजी त्यांचा नवीन कार्यभार स्वीकारतील.

'आम्ही तुम्हाला चिंधीचोर, हरा*** बोलू का?' ; दरेकरांनी जरांगेंना फटकारलं 

भाजन नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेंना खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले, महाराष्ट्र सुसंस्कृत आहे, मराठा समाजाचे फक्त आपणच आहोत, या आविर्भावात राहून मुख्यमंत्र्यांच्या आईंचा जरांगेंनी अपमान केला आहे. शिवराळ भाषा वापरली. आम्ही तुम्हाला चिंधीचोर, हराXXX बोलू का? तू कोण जरांगे? आपण आपल्या मर्यादेत राहा. अन्यथा आम्ही तुला सोडणार नाही, असा इशाराही दरेकरांनी जरांगेंना दिला आहे. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातून मोठी अपडेट; नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबीर 

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यव्यापी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर नाशिकमध्ये 14 आणि 15 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या शिबिराच्या निमित्ताने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भव्य शेतकरी जन आपूर्व मोर्चा काढण्यात येणार आहे.

सदाभाऊ खोत यांचं पुण्यातील सिंहगड रस्ता पोलिस स्टेशनसमोर आंदोलन सुरू

रयत क्रांती संघटनेचे आमदार आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी सध्या पुण्यातील सिंहगड रस्ता पोलिस स्टेशनसमोर आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांच्या म्हशी गोरक्षकांनी पकडून नेल्या असून, त्या परत मिळाव्यात अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. काही वेळापूर्वी खोत यांना धक्काबुक्कीही करण्यात आली होती.

मनोज जरांगेंच्या धाकधूक वाढणार;  गुणरत्न सदावर्तेंनी उचललं मोठं पाऊल

मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मोठा विरोध दर्शवला आहे. त्यांनी जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाला विरोध करत पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांना मुंबईत आंदोलनाची प्रवेश करण्याची परवानगी देऊ नये. त्यांचे आंदोलन रोखून धरा, अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे.

ST Employees Salary : बाप्पाची कृपा! एसटी कर्मचाऱ्यांना उद्या मिळणार ऑगस्ट महिन्याचा पगार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार गणपतीपूर्वीच मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार लवकर देण्याचा निर्णय झाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर देण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी मागील आठवड्यातच पगाराची फाईल वित्त विभागाकडे पाठवत निधीची मागणी केली होती. या मागणीला अखेर मान्यता मिळाली असून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत मिळणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Sanjay Shirsat : संजय शिरसाट पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी डीजेच्या आवाजामुळे त्रास होतो, त्याऐवजी चाळीसगाव आणि वैजापूरचा बॅण्ड वाजवा, असं आवाहन केलं. त्याच वेळी पैशांची मदत हवी असल्यास व्यासपीठावर नेते आहेत, त्यांनी नाही दिले तर माझी बॅग उघडीच आहे, असं विधान करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र शिरसाट यांच्या सततच्या विधानांमुळे ते वारंवार वादात सापडत असल्याची चर्चा रंगत आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंची सरकारला इशारा

मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “चार महिन्यांपूर्वी मुंबई आंदोलनाची तारीख दिली होती, पण सरकारनं काहीच केलं नाही” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “मराठ्यांना कायद्यात बसणारं आरक्षण द्या, आम्ही डोक्यावर घेऊन नाचू, पण दिलं नाही तर सरकार उलथवून टाकू,” असा इशाराही त्यांनी दिला.

Sadabhau Khot : पुण्यात गोरक्षकांकडून सदाभाऊ खोतांना धक्काबुक्कीचा प्रयत्न

पुण्यातील फुरसुंगी परिसरात गोरक्षकांनी शेतकऱ्यांच्या म्हशी घेऊन गेल्याने तणाव निर्माण झाला आहे. या घटनेची पाहणी करण्यासाठी गेलेले रयत क्रांती संघटनेचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे शेतकरी आणि खोत संतप्त झाले असून त्यांनी न्याय मिळावा यासाठी सिंहगड रोड पोलीस स्थानकासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे.

Manoj Jarange Patil : मुंबईदौऱ्यापूर्वी अंतरवाली सराटीत रंगली तयारी; लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात उत्साह

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्याची जोरदार तयारी अंतरवाली सराटीत सुरू आहे. गावात लेझीम पथकांची रंगीत तालीम होत असून यात स्वतः मनोज जरांगे पाटील यांनीही सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेली आकर्षक गाडी गावात दाखल झाली आहे. या गाडीच्या स्वागतासाठी गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मराठा समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला वेग देण्यासाठी 27 ऑगस्टच्या सकाळी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यांच्या या प्रवासासाठी गावकरी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने तयारी करत आहेत.

Women Right On Father Property : विधवा महिलांसंदर्भात उच्च न्यायालयाने घेतला महत्त्वाचा निर्णय; मिळणार मालमत्तेत अधिकार

विधवा महिलांच्या अधिकारांसंदर्भात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयाप्रमाणे अविवाहित, विधवा व परित्यक्ता महिलांना वडिलांच्या मृत्यूपश्चातही त्यांच्या मालमत्तेतून उदरनिर्वाह मिळविण्याचा अधिकार असल्याचा न्यायालयाने म्हटले आहे. महिलांचा हा अधिकार अबाधित ठेवण्याची नैतिक जबाबदारी वडिलांच्या मालमत्तेच्या वारसदारांवर असल्याचेही म्हणत महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिला आहे.

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह तिघांवर बडतर्फीची कारवाई

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, सुबोध जाधव यांना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून बडतर्फ केले आहे. खेडेकर भाजपात जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान ही कारवाई झाली आहे. मनसेच्या स्थापनेपासून वैभव खेडेकर पक्षात कार्यरत होते. २०१४ साली त्यांनी दापोली विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

Nashik News : गणेशोत्सवानिमित्त नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून बॅनरबाजी

गणेशोत्सवाच्या काळात नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. सध्या ही बॅनरबाजी चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. नाशिकच्या विनय नगर परिसरात हा बॅनर लावण्यात आला असून गणपती बाप्पा आणि वाहन मूशक (उंदीर) यांच्यात खड्ड्यांवरून काल्पनिक संवाद दाखवण्यात आला आहे.

Parinay Fuke : शिवराय असते तर मनोज जरांगेंची जीभ छाटली असती 

शिवराय असते तर मनोज जरांगेंची जीभ छाटली असती असे वक्तव्य भाजप नेते परिणय फुके यांनी केले आहे. कुणाही व्यक्तीबद्दल खालच्या दर्जाचे वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शोभत नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.

Pune News : लोकांचे  आक्षेप घेण्यासाठी आम्ही तयार आहोत : आयुक्त नवल किशोर राम

प्रभाग रचना जाहीर झाली आहे. त्यावर आक्षेप असणे साहजिक आहे. पुण्याची ४ लाख ८१ हजार लोकसंख्या वाढली आहे. पुणे शहरात एकच नगरसेवक वाढला. लोकांचे जे काही आक्षेप आहेत ते घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत नाही कारण या सगळ्या प्रशासकीय गोष्टी आहेत. निवडणूक विभाग, नगरविकास विभाग अशा अनेक यंत्रणा यात असतात. आक्षेप नोंदवण्यासाठी १० सप्टेंबर पर्यंत ही तारीख वाढवावी अशी काही स्तरातून मागणी आली आहे. अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.

devendra fadnavis : फडणवीस मुद्दाम आडमुठी भूमिका घेतात, जरांगे पाटलांचा आरोप

29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणसाठी आमरण उपोषण करणार आहे. २७ ऑगस्टला सकाळी १- वाजता ते मुंबईकडे कूच करणार आहे. कुणबी मराठी एक असा अध्यादेश काढा. आजूनही सरकारकडे दोन दिवस आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. फडणवीस मुद्दाम आडमुठी भूमिका घेत असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.

Ajit Pawar : 1972 नंतर राज्यात एकही मद्य परवाना दिलेला नाही 

राज्यात एकही नवा मद्य परवाना दिला नाही. 1972 साली जे परवाने दिले आहेत त्यानंतर एकही परवाना दिला नाही. जे जुने परवाने आहेत, त्यापैकी कोणता परवाना कुणाला द्यायचा हा वैयक्तिक अधिकार आहे. नगरविकास खात्याबाबत आलेल्या बातम्या खोट्या आहेत. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. महामंडळ बाबत संपूर्ण अधिकार राज्य सरकारचा आहे. ते कधी करायचं ते सरकार ठरवतं. असेही ते म्हणाले.

Ajit Pawar : सरकारी कर्मचाऱ्यांना उद्याच पगार मिळणार : अजित पवार यांची मोठी घोषणा

सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आम्ही उद्याच करणार आहोत. गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना १ सप्टेंबर ची वाट पाहावी लागणार नाही. उद्याच त्यांच्या खात्यावर पगार जमा होईल.

Ajit Pawar : आपलं राज्य आर्थिक शिस्तीत पुढे जात आहे : अजित पवार

देशातल्या सगळ्या राज्यांना केंद्राने कर्जबाबत सूचना केल्या आहेत. आपलं राज्य आर्थिक शिस्तीत पुढे जात आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. काही बाबतीत विविध विभागाचे पैसे देणे आहे. कोणत्याही कंत्राटदारांचे पैसे ठेऊन घेतले जाणार नाहीत. जे काम दर्जेदार झालं नाही त्यांना चौकशी शिवाय पैसे दिले जाणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

Sanjay Raut: एकनाथ शिंदे अपयशी ठरले

नगरविकास मंत्री म्हणून काम करण्यास एकनाथ शिंदे अपयशी ठरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Nagpur live: काँग्रेस पक्षाकडून महापालिकेत आंदोलन

नागपूर शहरातील खड्ड्याबाबत नागपुरात काँग्रेस पक्षाकडून अनोखे आंदोलन सुरू आहे. आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांच्या फोटो आणि जीपीएस लोकेशनसह हे आंदोलन सुरू केले आहे. मनपाचा खड्डे मुक्त नागपूरचा दावा खोटा ठरवण्यासाठी एका प्रकारे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुरावेच यानिमित्ताने दिला आहे.

Ajit Pawar live: सरकारी कर्मचाऱ्यांचा उद्या पगार होणार

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर गुड न्यूज दिली आहे. उद्या (मंगळवारी) सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन जमा होणार आहे.

BJP Live: बीएमसीवर महायुतीची सत्ता येईल: फडणवीस

मुंबई महापालिकेवर पुन्हा महायुतीची सत्ता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

Ladki Bahin Yojana KYC Mandatory:. या महिलांचा लाभ बंद केला जाणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.सरकारने पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी करणे मोठा निर्णय घेतला आहे. ई-केवायसी करुन फेरपडताळणी केली जाणार आहे. यामुळे जर अजून बोगस लाभार्थी असतील तर त्यांची माहिती समोर येणार आहे. या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे.

देवासाठी देहत्यागाचा निर्णय, महाराष्ट्रातील 10 भाविक

परमेश्वराचं बोलणवणं आलं आहे त्यामुळे आम्ही देहत्याग करणार असल्याचे तब्बल 20 भाविकांनी जाहीर केले आहे. कर्नाटकमधील अथणी तालुक्यातील अंनतपूर येथील पाच भाविकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाविक देखील यामध्ये आहेत. जत तालुक्यातील एक महिला आणि पुरुष भक्त देखील देहत्याग करणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

MNS : मनसेचा कोकणातील मोठा नेता भाजपच्या वाटेवर

मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशासाठी नितेश राणेंसह भाजप नेत्यांनी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. खेडेकर भाजपमध्ये गेले

Eknath Shinde : लोकसभेच्या निकालानंतर मतचोरीचा आरोप का नाही? - एकनाथ शिंदे

सध्या मतांची चोरी झाल्याचे गळे विरोधकांकडून काढले जात आहेत. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्याचे प्रयत्न काही जण करत आहेत. मात्र जेव्हा लोकसभेत तुमचे उमेदवार जास्त निवडून आले, तेव्हा तुम्ही हे आक्षेप का घेतले नाहीत असा सवाल याप्रसंगी केला. असे सवाल एकनाथ शिंदे यांनी संगमनेरमधील शिवसेनेच्या कार्यक्रमात केला.

Ajit Pawar : अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर, जिल्हाध्यक्षांना खडसावले

अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरात दाखल होताना त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी पुष्पगुच्छ घेईन हजर होते. रस्त्यातच स्वागताची तयारी करत असताना अजित पवारांनी त्यांनी सुनावले. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आसुरलेकर यांचा पुष्पगुच्छ न स्वीकारत कार्यालयात येण्याच्या सूचना केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्ट मंडळ देखील अजित पवारांची भेट घेणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com