Maharashtra Live Updates : 'इतका जातीद्वेस कशासाठी?' जरांगेंना परवानगी नाकारताच आव्हाड संतापले

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama

Jitendra Awhad On Manoj Jarange Patil Protest : 'इतका जातीद्वेस कशासाठी?' जरांगेंना परवानगी नाकारताच आव्हाड संतापले

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय केला असून येत्या दोन दिवसात लाखोंच्या घरात मराठा समाजाला घेऊन मुंबईवर धडकू असा इशारा दिला आहे. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना मुंबईत आंदोलन करण्यास मनाई केल्याने वातावरण जास्तच तापले आहे. यामुळे जरांगे यांनी आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावू असे सांगितले आहे. त्यांना मनाई केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी मराठ्यांना हे सरकार बदमान करत असल्याचा आरोप केला आहे. तर इतका जातीद्वेस कशासाठी दाखवला जातोय, असा सवाल केला आहे.

लक्ष्मण हाके पोलिसांच्या नजर कैदेत

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज दुपारी चारच्या दरम्यान गेवराई येथे पोहचे. यावेळी पोलिसांनी गेवराईच्या सीमारेषेवरच त्यांना रोखत नजर कैद केले आहे. मात्र या संदर्भात पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ करत असून लक्ष्मण हाके यांच्याशी संपर्क झालेला नाही. दरम्यान मनोज जरांगे बुधवारी (ता.27) मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी हाके यांना नजर कैदी ठेवल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे.

‘माझं आणि शिंदे साहेब यांचे संबंध चांगले' : मुख्यमंत्री फडणवीस

गेल्या काही दिवसापासून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. फडणवीस हे शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्यावर नाराज होते. तशी नाराजी त्यांनी, नगरविकास खात्यांच्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. त्यानंतर आता फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, ‘माझं आणि शिंदे साहेब यांचे संबंध चांगले आहेत, अशी प्रतिक्रिया दिला आहे.

शिंदेवर फडणवीस नाराज? अजितदादांनी एका वाक्यात प्रश्नाचा निकाल लावला; म्हणाले, 'ती माहिती...'

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या कामगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा आहे. यावरून त्यांनी नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारले असता, त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले. पवार म्हणाले, ती माहिती धांदात खोटी आहे.

पैठणमध्ये जरांगेंविरोधात सोशल मीडियावर कमेंट करणाऱ्याला फासलं काळं

27 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी मधून मुंबईकडे कूच करणार आहेत. याच अनुषंगाने मराठा समाज ठिकठिकाणी मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज झाल्याचा पाहायला मिळतोय. मात्र, सोशल मीडियातील पोस्टवरती पैठण येथील एका तरुणाने जरांगें विरोधात सोशल मीडियावरती कमेंट केल्यामुळे जरांगे समर्थक हे आक्रमक झाले. पैठणच्या बस स्टँड चौकामध्ये जरांगे समर्थक यांनी या तरुणाच्या चेहऱ्यावरती काळ फासलं आहे.

उबाठा शिवसेनेचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांचा शिवसेनेत प्रवेश

उबाठा शिवसेनेचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांचा शिवसेनेत प्रवेश. आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा उबाठा शिवसेनेत पडझड सुरू झाली आहे.

गणेशोत्सव काळात आंदोलन पुढे ढकलता आलं असतं; चंद्रशेखर बावनकुळे

गणेशोत्सव काळात मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन पुढे ढकलता आलं असतं. पण जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. मात्र उच्च न्यायालयाने ज्या प्रमाणे निर्देश दिले आहेत, त्याप्रमाणे पुढील प्रशासकीय कार्यवाही करू, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

संग्राम थोपटेंच्या कारखान्याला मदत देण्यास अजितदादांचा विरोध

भाजप नेते, माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड कारखान्याला आर्थिक मदत करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध दर्शवला आहे. डबघाईला आलेल्या कारखान्याला आर्थिक मदत कशासाठी? असा सवाल अजितदादांनी उपस्थित केला आहे.

पुणे बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करा : शरद पवारांचं फडणवीस यांना पत्र

पुणे बाजार समितीतील गैरव्यवहाराची चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसे पत्रच त्यांनी लिहिले आहे. यात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रवक्ते विकास लवांडे यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

Gunratna Sadawarte : मनोज जरांगे यांच्यामागे शरद पवार, उद्धव ठाकरे..

मुंबईला जो कुणी अस्थिर करण्याचा प्रयत्न करेल त्याला कायदा त्याची जागा दाखवेल. मनोज जरांगेंना आंदोलनासाठी न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. जरांगे यांच्याकडून महिलांबाबत चुकीच्या शब्दात टीका केली जाते. मनोज जरांगेंच्या आंदोलनावर आम्ही रितसर पोलिसांकडे तक्रार दिली होती. न्यायालयातही अर्ज केला होता. मनोज जरांगे न्यायालयापेक्षा मोठे नाहीत. मनोज जरांगे यांच्यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत.

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटमधील नोंदीनुसार आम्हाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी केली आहे. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत. हैदराबाद गॅझेटच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या समितीला आता आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जरांगे यांनीच केलेल्या मागणीनुसार शिंदे समितीला मुदतावाढ देण्यात आली आहे, असे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

Pune News : पुण्यात गणेशोत्सवात अकरा दिवस ड्राय डे..

पुणे शहरातील खडक, विश्रामबाग, फरासखाना या भागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सवातील संपूर्ण अकरा दिवसा मद्यविक्रीवर बंदी असणार आहे. तर संपूर्ण जिल्ह्यात अनंत चतुदर्शचीच्या दिवशी ड्राय डे असणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत

Gunratna Sadawarte : नो एन्ट्री इन आझाद मैदान, डंके की चोटपर!सदावर्तेंनी जरांगेना डिवचले..

मुद्दा असा आहे, न्यायालयापेक्षा कोणीही मोठं नाही. जरांगेही कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा मोठा नाही. उच्च न्यायालयात दोन याचिका आहेत, एक जनहित याचिका आणि दुसरी माझी याचिका. मुंबई उच्च न्यायालयाने यापैकी एका प्रकरणाच्या सुनावणीत आझाद मैदानावर पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही, असे निर्देश दिले आहेत. जे कोणी जरांगेंचे गॉडफादर, मसिहा किंवा मास्टरमाईंड असतील त्यांनी आता जरागे यांना सांगावं की, आता नो एन्ट्री इन आझाद मैदान. डंके की चोटपर असा हा आदेश आहे. तो प्रत्येकाला लागू आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

Rohini Khadse : खेवलकरच्या व्हाॅटसपमधील चॅट रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून डिलीट..

जळगाव मधील सोनार आडनावाच्या व्यक्तीच्या नावे असलेले सीम कार्ड 2012 पासून प्रांजल खेवलकर वापरत होते. मात्र जेव्हा खेवलकरांना अटक झाली तेव्हा जळगावमधील सोनार नावाच्या व्यक्तीने त्याचे सिमकार्ड हरवल्याची तक्रार दिली. त्या तक्रारीचा उपयोग करून त्याच नंबरचे दुसरे सिमकार्ड खरेदी केले आणि ते मोबाईलमध्ये टाकून त्या नंबरवरचे सगळे व्हॉटसप चॅट डिलीट केले. पुणे पोलिसांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या सोनार नावाच्या व्यक्तीची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून आपण चॅट डिलीट केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणंय. 

Cabinet Meeting : या साखर कारखान्यांना कर्जासाठी शासन हमी

पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखाना लि. अनंतनगर निगडे, (ता. भोर) या साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास मंजुरी तसेच संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सुमननगर, ता शेवगाव, अहिल्यानगर या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मुदती कर्ज शासन हमीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली गेली आहे.

Beed News : सिंदफणा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यांचा विस्तार व बॅरेजमध्ये रुपांतरण होणार

बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव , ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर (का) टाकळगाव (हिंगणी) (ता. गेवराई) या तीन कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यांचा विस्तार व बॅरेजमध्ये रुपांतरण करण्याच्या कामास मान्यता देण्यात आली.

Manoj Jarange Patil : न्यायालयाने परवानगी नाकारली, तरी मनोज जरांगे निर्णयावर ठाम, मुंबईत जाणारच..

आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणारे लोक आहोत, , न्याय देवता आम्हाला न्याय देईल, आमच्या वकील बांधवांची देखील टीम आहे, ते न्यायालयात जातील.  आम्हाला न्याय मिळेल. आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार आहोत, आणि लोकशाही पद्धतीने करण्यात येणारं आंदोलन कधीही रोखता येत नाही. सरकारने गोर गरिबाच्या भावनांशी खेळू नये, शंभर टक्के आम्हाला न्यायालयाकडून परवानगी मिळणार, नाकारण्याचं कारणच काय? नाकारण्याचं कारण त्यांना द्यावं लागेल, आम्ही मुंबईत जाणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने आज मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली आहे. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याचवेळी, जरांगे यांना निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे, असे खंडपीठाने नमूद केले.  मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. 

Shivaji Sawant : शिवाजी सावंत शिवसेनेला रामराम ठोकणार, भाजपत प्रवेश करणार 

गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करणार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी दिली आहे. शिवसेनेत मी संपर्कप्रमुख असताना माझ्या तालुक्यातील तालुकाप्रमुख, शहरप्रमुख परस्पर निवडले गेले. शिवसेनेत संपर्कप्रमुख पद हे जिल्ह्याच्या दृष्टीने सर्वात मोठे पद आहे. मात्र मला न विचारता निवडी होत असतील तर तिथे राहणे योग्य नाही असे मला वाटले. शिवसेनेत एक शिस्त होती मात्र अलीकडच्या काळात ती विस्कळीत झाली आहे असं ते म्हणाले.

laxman hake : लक्ष्मण हाके म्हणजे भटका कुत्रा : विजयसिंह पंडितांचा पलटवार

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडितांमधील वाद टोकाला गेला आहे. हाकेंच्या टिकेनंतर आमदार विजयसिंह पंडितांनी जोरदार प्रत्युत्त दिलं आहे. लक्ष्मण हाके म्हणजे भटका कुत्रा आहे. 'माझ्याबाबत बोलण्याची त्याची औकात नाही'. असं म्हणत विजयसिंह पंडितांनी हाकेंवर पलटवार केला आहे.

Nagpur news : नागपुरात कंत्राटदारांचे भीक मांगो आंदोलन...

नागपूर येथे संविधान चौकात कंत्राटदारांनी भीक मांगो आंदोलन सुरु केलं आहे. शासनाने काम करुन पैसे न दिल्याने विदर्भातील कंत्राटदार यांनी एकत्र येत केले आंदोलन पुकारलं. कंत्राटदारांनी काळ्या रंगाचा टीशर्ट घालून स्त्याच्या कडेला उभे राहत भीक मागत निषेध नोंदवला.

Manoj Jarange News : बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिली आहे. बीड जिल्ह्यात मराठा व ओबीसी आरक्षण प्रश्नावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्या कडून जमावबंदीचे आदेश दिले आहे.

Nanded Crime: मराठवाड्यात विवाहित आणि प्रियकराची हत्या

विवाहित मुलीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराची आणि मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय. लग्नानंतरही विवाहिता आणि प्रियकराचं भेटणं सुरु होतं. सोमवारी हा मुलगा विवाहितेला भेटायला आला होता.

Manoj Jarange News: आम्हाला एक रस्ता द्या: जरांगे

सरकारने आम्हाला एक रस्ता द्यावा, त्या रस्ताने आम्ही आझाद मैदानावर जाणार, मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी यांच्यासोबत माध्यमांसमोर चर्चा करणार असे जरांगे यांनी सांगितले

Manoj Jarange Live: मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जरांगेंच्या भेटीला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले आहेत.

Pune Live Updates: स्वारगेट बस स्टँडवर गणेश भक्तांची गर्दी

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावाकडे जाण्यासाठी कोकणवाशीयांची स्वारगेट बस स्थानकावर मोठी गर्दी झाली आहे. कोकणाकडे जाणाऱ्या एसटीबस मध्ये मोठी गर्दी होत आहे. मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील जास्त असल्याचे या बसमध्येही गर्दी होत आहे.

Manoj Jarange live:वाहनांच्या पार्किंगसंदर्भात जागेची पाहणी

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मराठा आंदोलक ॲक्शन मोडवर आले आहेत.मुंबईत बाहेरून येणाऱ्या आंदोलकांच्या वाहनांच्या पार्किंगसंदर्भात जागेची पाहणी करण्यात येत आहे. मराठा समाजाच्या मुंबईतील शिष्टमंडळाने पोलिस अधिकाऱ्यांसह समन्वयाने पाहणी केली.

Shambhuraj Desai : रस्त्यांची कामे मुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार - शंभूराज देसाई

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील दोन सातारा-कोल्हापूर आणि कराड-चिपळूण रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित कंपन्यांना इशारा दिला आहे. या दोन्ही महामार्गांची कामे संथ गतीने सुरु असून या कामाविषयीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 15 दिवसाला बारचार्ट सादर करावा. अन्यथा दिलेल्या अवधित काम पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र शासनाचा मंत्री आणि सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करू असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

Bhandara Guardian Minister : भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले

भाजपने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची सोमवारी रात्री अचानक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी केली आहे. तर आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Laxman Hake : लक्ष्मण हाकेंसह 14 लोकांवर सुमोटोनुसार गुन्हा दाखल

बीडच्या गेवराईमध्ये काल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा राडा झाला होता. यामध्ये लक्ष्मण हाकेंच्या अंगावर विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी चपला फिरकवल्या होत्या तर हाकेंच्या समर्थकांकडून गाडीवरती उभारून दांडके दाखवण्यात आले होते. त्यानंतर आता पोलिसांनी सुमोटो नुसार 14 आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचाही सहभाग आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांना जेलमध्ये टाका ओबीसी समाजाची मागणी

मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला EWS अंतर्गत 10 % आरक्षण असताना पुन्हा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं, यासाठी गेले अनेक वर्षे मराठ्यांना न्यायालयात आरक्षण टिकवता आले नाही. तरीही पुन्हा राजकारणसाठी मनोज जरांगे-पाटील पुन्हा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत. तरी सरकारने जरांगे विरोधातील एसआयटी आहवाल सादर करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकावे अशी मागणी ओबीसी नेते ॲड. मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील, नितीन बोराटे यांनी केली आहे.

Vantara : 'वनतारा'ची SIT मार्फत चौकशी करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

रिलायन्स फाऊंडेशनच्या वनतारा प्रकल्पाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. वन्यजीव संरक्षण कायदा आणि देशविदेशातून वन्यप्राणी ताब्यात घेण्याच्या प्रकल्पाच्या विद्यमान प्रक्रियेबाबतची चौकशी केली जाणार आहे. न्या. जया सुकीन यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायलयाने हे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com