पूर ग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. आनंद दिघे युवा प्रतिष्ठान व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मोफत औषध पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी औषधांनी भरलेला एक मोठा टेम्पो पुणे येथून पूरग्रस्त भागाकडे रवाना झाला आहे. यावेळी पक्षाचे उपनेते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, पुणे जिल्हा प्रमुख उल्हासजी शेवाळे, राज्य संघटक वसंतजी मोरे, शहर प्रमुख संजयजी मोरे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर मोडक, सुजित थेवरे, नितीन गावडे, प्रतिष्ठानचे अभिषेक जाधव, रोहन आंब्रे, संजय पाठक तसेच अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा टेम्पो रवाना झाला.