Maharashtra Live Updates : मुंबईत दाखल झालेल्या मराठा समाजाकडून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू...

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Manoj Jarange 2
Manoj Jarange 2Sarkarnama

Maratha Reservation Mumbai Andolan : मुंबईत दाखल झालेल्या मराठा समाजाकडून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू...

मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांनी एकत्र येत आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईत दाखल झालेल्या मराठे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू केली आहेत. बीएमसी मुख्यालयासमोर मराठा आंदोलकांनी आंघोळ करून, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईत तब्बल तीन हजार गाड्या घेऊन दाखल झाले आहेत. त्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी झाली आहे.

Bachchu Kadu : बच्चू कडू देखील मुंबईत कर्जमाफीसाठी मोठ आंदोलन उभारणार

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू 2 ऑक्टोबरऐवजी 28 ऑक्टोबरला मुंबईत मोठ आंदोलन उभारणार आहेत. यासाठी बच्चू कडू उद्यापासून राज्यभर शेतकरी, शेतमजूर हक्क यात्रा काढणार आहे. या यात्रेचा प्रारंभ वाशिम जिल्ह्यातून होणार असून, प्रत्येक जिल्ह्यात 5 ते 6 सभा घेण्याचा निश्चित केला आहे.

Radhakrishna Vikhepatil : जरांगे पाटलांशी चर्चा करणार, चर्चा केली तर, मार्ग निघेल; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मनोज जरांगे पाटील मुंबईला पोचले आहे. त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. चर्चेतून मार्ग निघू शकतो. जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत पूर्ण सहानुभूती आहे. सरकारकडे प्राप्त झालेल्या निवेदनावर कार्यवाही सुरू आहे. आता पुन्हा निवेदन आल्यावर चांगल होईल. जरांगे पाटलांच्या भूमिकेचा नेहमीच आदर केला आहे. चर्चा झाल्यास, मार्ग निघेल, अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं.

Maratha Reservation : भाजप आमदारांकडून मुंबईत मराठा आंदोलकाच्या निवासाची अन् जेवणाची सोय

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर मराठा कार्यकर्ते घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यभरातून येणाऱ्या मराठा आंदोलकांसाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहेत. राज्याचे इतर भागातून येणाऱ्या मराठा आंदोलकासाठी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी त्यांच्या मुंबईतील नेरूळ इथं निवास, जेवणाची तसेच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली.

Manoj Jarange Mumbai : मुंबईतील आंदोलनाला परवानगी वाढवून द्यावी; जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा

मुंबईत आंदोलनाला परवानगी वाढवून द्यावी, अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत सगळ्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत मी मुंबईची जागा सोडणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला आहे. जरांगे पाटील यांना आज सायंकाळ पाच वाजेपर्यंतच आंदोलनाला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

Manoj Jarange Mumbai Update : मराठ्यांच्या अंगावर, डोक्यावर विजयाचा गुलाल घेतल्याशिवाय मागे हटणार नाही; जरांगेंचं मुंबईत बेमुदत उपोषण सुरू

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगली संधी आहे. मराठ्यांची नाराजी ओढावून घेऊ नका. सरकारने आडकाठी न आणता उपोषण सुरू करू द्याव. आम्ही फक्त आरक्षण घ्यायला आला आहोत. मी मुंबईत आरक्षणासाठी आला आहोत. मराठ्यांच्या अंगावर, डोक्यावर विजयाचा गुलाल घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. मला तुरुंगात नेऊन टाकलं, तरी चालेल. तिथं सडलो, तरी चालले. पण मागं हाटणार नाही," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Manoj Jarange : 'गोळ्या घातल्या तरी, आता मागे हटणार नाही'; मनोज जरांगे मुंबईत पोचताच सरकारला आव्हान

"आपलं बेमुदत उपोषण दहा वाजल्यापासून सुरू झालं आहे. मुंबई जाम केली ना, आता दोन घंट्यात मुंबई मोकळी झाली पाहिजे. मुंबई पोलिस जिथं सांगतील, तिथं गाड्या पार्किंग करा. वाहतूक कोंडी झाली नाही पाहिजे. कोणताही पोलिस नाराज झाला नाही पाहिजे. आंदोलनासाठी सरकार पुढची परवानगी देईल, न्यायालय देखील दखल घेईल. आपण शिकलो नाही. त्यामुळे 70 वर्षे समाजाचं वाटोळं झालं आहे. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी माघार नाही. हटणार नाही. मराठा समाजाला विजय मिळवल्याशिवाय इथून हलायचं नाही," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल

मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात दाखल झाले आहेत. ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते आंदोलन करणार आहेत. अवघा एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जरांगे पाटीलांशी चर्चा करणार - आमदार सना मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक म्हणाल्या की, सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही संपूर्ण विषय समजून घेत त्यावर तोडगा काढत आहोत. सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. माझ्या मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील हे पुढे जात आहे. मी त्यांचे स्वागत केले.

लवकरच जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल होणार

मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले असून त्यांचा ताफा लवकरच आझाद मैदानात पोहोचणार आहे. आझाद मैदानात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. सीएसएमटी स्थानका परिसरात देखील मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांची गर्दी झाली आहे.

Maratha Reservation : मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले

मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज ते आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत. मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. एक मराठा लाख मराठा, अशी घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com