केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. ते थोड्याच वेळात 11 च्या सुमारास साईबाबांचे दर्शन घेत आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. त्यानंतर लोणी (प्रवरानगर) येथे कारखान्याच्या नूतनीकरणासह पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्यांचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेले नऊ पर्यटक समुद्रात बुडाले होते. यापैकी 5 पर्यटकांचे मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत. तर दोघे पर्यटक सुखरूप बचावलेत. उर्वरित दोन पर्यटकांचा शोध अद्याप सुरूच आहे.
दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरवाढ केली आहे. त्यानुसार 1 ते 100 युनिट वापरावर प्रति युनिट 35 पैसे आणि 500 युनिटपेक्षा अधिक वापरावर 95 पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी महावितरणने याबाबतचे सर्क्युलर जारी करत सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिलेत.
सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांना मानसिक उपचारांची गरज असल्याचं म्हटलं आहे. शिवाय रामदास ते फर्स्टेट झालेत. कारण त्यांना सतत वाटतं की एकनाथ शिंदे त्यांच्या पाठिशी नाहीत. कोकणात उदय सामंतांचं प्रस्थ वाढतंय मात्र दुसरीकडे कदमांचं दमन होतंय. त्यामुळे आपल्या मुलाचं काय होणार? असं त्यांना वाटतंय कारण त्यांच्या मुलाच्या बारवर रेड पडली ती रेड एकनाथ शिंदे थांबवू शकले नसते का?' असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला.
मुंबईत आज मध्य रेल्वेच्या नियमित देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी हे ब्लॉक आवश्यक असून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.
पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांना लोहगावात धक्काबुकी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही धक्काबुक्की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडू खांदवे यांच्याशी झालेल्या वादानंतर झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधीत तक्रारी दाखल करण्यात आली आहे.
केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असून काल रात्री ते शिर्डीत पोहोचले आहेत. त्यानंतर आज लोणी व कोपरगाव येथे त्यांची सभा होणार आहे. या सभेसाठी भाजपने शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन केले आहे. कोपरगावमध्ये शेतकरी मेळावा, तसंच देशातील पहिला सहकारी साखर कारखान्याच्या वतीने, क्रॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन शहांच्या हस्ते केलं जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.